Lok Sabha Election 2024 Voting LIVE Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पवार कुटुंबाने एकटं पाडलं? अजित पवार यांचा 'दीवार टच'; 'मेरे पास मेरी माँ है..!

Mangesh Mahale

Baramati News: बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानास सुरवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना एकटं पाडल्याचा आरोप केला जात आहे.

काटेवाडी मतदानकेंद्रावर जाण्यापूर्वी अजित पवार यांच्या आई आशाताई त्यांच्यासोबत होत्या. निवडणुकीत अजितदादांना एकटं पाडलं आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "मेरे पास मेरी मॉ हे,' असे म्हणत विरोधक आणि कुटुंबियांनी त्यांनी उत्तर दिले.

प्रचाराच्या सुरवातीच्या टप्प्यात (Lok Sabha Election 2024 Voting LIVE)अजित पवार यांनी कुटुंबात मला एकटे पाडायचा प्रयत्न केला जात आहे, ही राजकीय लढाई अशी कौटुंबिक पातळीवर येईल, असे मला कधी वाटले नव्हते, असे अजित पवार म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या तिसरा टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 11 जागासाठी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत. महाराष्ट्रात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होत आहे.

  • बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण २३ लाख ६२ हजार ४०७ मतदार; तर दोन हजार ५१६ मतदान केंद्रे आहेत

  • कडक उन्हाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीट दिली आहे.

  • मतदानासाठी मोठी रांग असेल; तर त्यांच्यासाठी प्रतीक्षा हॉलमध्ये बसण्याची सुविधा केली आहे.

  • एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असल्यास मांडव घालण्यात आला आहे.

  • मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आला आहे.

  • वयोवृद्ध मतदारांचे केंद्रावर फूल देऊन स्वागत केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT