Baramati Political News : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी (ता. ५) थंडावला आहे. आता मतदानासाठी प्रशासनाकडून मोठी लगबग सुरू झाली आहे. अत्यंच चुरशीची लढत होणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात 23 लाख 62 हजार 407 मतदार आहेत. तर त्यांना मतदान करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात दोन हजार 516 मतदान केंद्र आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.
बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजय थेट लढत होत आहे. मात्र हा गड राखण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसून आले. त्यामुळे या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. अटीतटीची लढत होणाऱ्या या मतदारसंघात कडक उन्हात प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात येत आहे.
कविता द्विवेदी म्हणाल्या, प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल कीट देण्यात आली आहेत. मतदानासाठी मोठी रांग असेल, हे गृहीत धरून मतदारांसाठी प्रतीक्षा हॉलमध्ये बसण्याची सुविधा केली आहे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असल्यास मांडव घालण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार आहे. वयोवृद्ध मतदारांचे केंद्रावर फूल देऊन स्वागत केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ईव्हीएम मशिनची EVM सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थित पूर्ण झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशिनचे वाटप करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी (ता. 6) अंतिम प्रशिक्षण घेतले जाईल. त्यानंतर कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना होतील, असेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.