Manoj Jarange Patil  Sarkarnama
पुणे

Shirur Loksabha Election 2024 : मराठे लोकसभेच्या रिंगणात! शिरूर लोकसभेसाठी शंभर उमेदवारी अर्ज...

Maharashtra lok sabha election news Marathi : महाराष्ट्रातल्या अनेक गावागावांत मराठा समाज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. अशीच तयारी हडपसर विधानसभा मतदारसंघामधूनही करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नवी योजना आखली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी किमान 5 ते 7 उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत.Maharashtra lok sabha election news Marathi महाराष्ट्रातल्या अनेक गावागावांत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे. अशीच तयारी हडपसर विधानसभा मतदारसंघामधून करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारने आरक्षणासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर लोकसभा मतदारसंघामधून 100 हून अधिक उमेदवारी अर्ज भरण्याचा संकल्प करण्यात आला आहे. Shirur Loksabha Election 2024

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन त्या पूर्ण केल्या नाहीत. मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकारने न मागितलेलं दहा टक्के आरक्षण समाजाला देऊ केलं आहे. याबाबत पुढील भूमिका ठरवण्यासाठी जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटीत Antarwali Sarathi बैठक होणार आहे. या बैठकीला हडपसर परिसरातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी जाण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणुकीत हडपसर विधानसभा Hadapsar Vidhansabha Constituency मतदारसंघातून शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी Shirur Loksabha Constituency शंभरहून अधिक मराठा समाजाच्या बांधवांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्धारदेखील केला आहे. Maharashtra lok sabha election news Marathi समाजातील बांधवांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, तसेच 24 मार्च रोजी होणार्‍या बैठकीत येणाऱ्या निर्णयानुसार पुढील दिशा ठरवली जाईल. त्याचबरोबर हडपसर आणि परिसरातील संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे Manoj Jarange Patil यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार न करता जो समाजासाठी उभा राहील तो आमचा उमेदवार राहील, अशी भूमिका मराठा आरक्षण समन्वयक समिती, हडपसर यांच्या वतीने या वेळी घेण्यात आली.Maharashtra Maratha community is preparing to fill the nomination.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून Maratha Reservation घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका नेमका कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला बसेल हे सांगणे सध्या कठीण आहे. तरी याचे दूरगामी परिणाम लोकसभा निवडणुकी Loksabha Election वरती होणार आहेत हे नक्की. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांना मराठा समाजाच्या नाराजीचे आव्हान पेलत आपला विजयाचा मार्ग शोधावा लागणार आहे.

Edited by : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT