Vasant More News : पुण्यातील महाराष्ट नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले असून 'राज साहेबांच्या आदेशाचे मी तंतोतंत पालन करणार आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत सोशल मीडियावर बोललं तर हकालपट्टी अटळ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या या तंबीनंतर वसंत मोरेंनी 'मी राज साहेबांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार आहे', असं म्हटलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वसंत मोरे हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर मध्यंतरी त्यांना थेट अजित पवारांनीही पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांनी वसंत मोरेंची स्वत: भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरे हे पक्ष सोडण्याच्या आणि पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांवर पडदा पडला होता.
तसेच मध्यंतरी पुणे मनसेतील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे.
''माझ्या पक्षातील कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला. किंवा माझ्याशी बोला. पण जर माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केले तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा'', असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्यानंतर पक्षातील नाराज असलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांना इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. तर आता याबाबत वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून फक्त ''मी राज साहेबांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणार आहे'' असं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या तंबीनंतर वसंत मोरेंची बोलती बंद होणार? अशी चर्चा आता पुन्हा एकदा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.