केसरकरांचा निर्णय सावंतवाडीकरांना रूचला नाही : ग्रामपंचायत निवडणुकीत पानिपत; शिवसेनेची ताकद कायम

शिवसेनेत उभी फूट पडूनही ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली ताकद दाखवून दिली आहे.
Sawantwadi : Gram Panchayat Result
Sawantwadi : Gram Panchayat ResultSarkarnama

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : राज्याच्या राजकारणात शिवसेनेत उभी फूट पडूनही ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) आपली ताकद दाखवून दिली आहे. सावंतवाडी (Sawantwadi) तालुक्याचा विचार करता येथे शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकावर राहत आपला गड शाबूत राखला असून शिंदे गटाचे (Eknath Shinde) पानिपत झाले आहे. एकूणच शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांच्या भूमिकेला जनतेने नाकारल्याचे ग्रामपंचायत निकालावरून दिसून आले. शिंदे गटाच्या मदतीमुळे सावंतवाडीत भाजप (BJP) नंबर एकचा पक्ष राहिला आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला त्याचा फायदा होणार आहे. (Deepak Kesarkar was shocked by the result of Gram Panchayat election)

सावंतवाडी तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यात सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद बिनविरोध झाले होते, तर तीन ग्रामपंचायत पूर्णत: बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, मतदानानंतर निकालावरून स्पष्ट झालेले चित्र पाहता जनता उद्धव शिवसेनेसोबत आजही कट्टर असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच मंत्री दीपक केसरकरांना जनतेने नाकारल्याने दिसून आले.

Sawantwadi : Gram Panchayat Result
भोरच्या म्हाकोशीत ‘नोटा’ला सर्वाधिक मते; पण, कोणत्या उमेदवारांना विजयी घोषित केले पहा?

ऐन शेवटच्या क्षणी झालेली भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेतील युती पाहता सुरुवातीला बऱ्याच गावांत शिंदे गटाला सदस्यपदांच्या उमेदवाराला झगडावे लागले आणि म्हणूनच काही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आपले संपूर्ण पॅनेल उभे करू शकले. काही ठिकाणी एक दोन सदस्य आणि सरपंचपदासाठी उमेदवार रिंगणात होते. त्यातील काही सदस्य आणि सोनुर्ली व सातुळी, बावळाट येथील सरपंच निवडून आले आहेत, तर सात ते आठ ठिकाणी जनतेने सरपंचपदाच्या उमेदवारांना नाकारले.

Sawantwadi : Gram Panchayat Result
भुजबळांचे ‘ते’ विधान.... सत्ताधाऱ्यांचा प्रचंड गोंधळ...अखेर अजितदादांची दिलगिरी!

दुसरीकडे, शिवसेनेने भाजपाला जोरदार लढत देत बऱ्याच ठिकाणी आपला गड राखला आहे. ठिकठिकाणी सदस्यही निवडून आले आहे. आज अधिकृतरित्या चराठा, कलंबिस्त, नेमळे, सातार्डा, धाकोरे, पारपोली, वेत्ये, पाडलोस, भोमवाडी येथे सत्ता काबिज केली आहे. चार ते पाच ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला निसटता पराभव स्वीकारावा लागला. बालेकिल्ला असलेल्या माजगाव ग्रामपंचायतीत मोठ्या फरकाने पराभव झाला. एकुणच तालुक्यातील निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य, सरपंच पाहता तालुक्यात दोन नंबरचा पक्ष शिवसेना राहिला आहे.

Sawantwadi : Gram Panchayat Result
जयंत पाटील-आबा गटाने राष्ट्रवादीला सांगलीत बनविले ‘नंबर वन’: भाजपची मुसंडी; काँग्रेसची पिछेहाट

सावंतवाडीचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या निवडणुकीत फिरकलेले नाहीत. साधी बैठक घेण्याचे दातृत्वही त्यांनी दाखविले नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत शिवसेनेमध्ये चिड असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेना सगळ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सक्रीय दिसून आली. निवडून आलेल्या गावविकास पॅनेल आणि काही ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या खात्यात अजून भर पडणार आहे.

Sawantwadi : Gram Panchayat Result
राणा पाटलांसह काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी गड राखले; शिंदे गटाचा मात्र प्रभाव दिसेना

काँग्रेसच्या पदरी निराशाच पडली आहे. येथे गाव विकास पॅनेल म्हणून आम्ही निवडणूक लढविली होती, असे सरपंच म्हणून निवडून आलेल्या दाजी गावकर यांनी स्पष्ट केले. परंतु, येथे काँग्रेसने दावा केला आहे, तर राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी असा दावा करण्यात आला. एकूणच या सगळ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला बांधण्यास सुरवात केली आहे. येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीने मजल मारली असून एका ग्रामपंचायतीवर संपूर्ण सत्ता काबिज करत काही ग्रामपंचायतींवर सदस्यही निवडून आणले आहेत. सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षात येथे पक्षाची पिछेहाट झाली होती. पण, कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला ऊर्जा दिली आहे.

Sawantwadi : Gram Panchayat Result
‘...तर भारत जोडो यात्रा तातडीने थांबवा’ : केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

केसरकरांच्या समर्थकांची सत्ता भाजपने हिसकावली

ग्रामपंचायतीचा निकाल पाहता सावंतवाडी मतदार संघात मंत्री केसरकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे. येथे भाजपने मुसंडी मारली असून केसरकरांचे खंदे समर्थक असलेल्या केसरी, फणसवडे येथील जेष्ठ कार्यकर्ते राघोजी सावंत यांच्या पॅनेललाही पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांची कित्येक वर्षांची सत्ता भाजपने हिरावून घेतली आहे, त्यामुळे केसरकरांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com