Murlidhar Mohol slams Rohit Pawar  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol slams Rohit Pawar : रोहितदादा, घरात भांडणे का लागली ? याचं उत्तर शोधा ; मोहोळांचा टोला, शिल्लक पार्टी..

Maharashtra Politics : नव्या ‘विश्व प्रवक्त्यां’ना पार्टीत काय चाललंय..

सरकारनामा ब्यूरो

Murlidhar Mohol slams Rohit Pawar : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांच्या विरोधात कंबर कसली आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर रोहित पवार टीकास्त्र सोडत आहेत.

रोहित पवारांच्या टिकेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची खरमरती टीका केली आहे. मोहोळ यांनी टि्वट करीत रोहित पवारांना टोला लगावला आहे.

आपल्या टि्वटमध्ये मोहोळ म्हणतात, " या नव्या ‘विश्व प्रवक्त्यां’ना पार्टीत काय चाललंय, याचा काडीचाही अंदाज आला नाही, आता भाजपावर शिंतोडे उडवताय…रोहितदादा, भाजपावर आरोप करण्यापेक्षा घरात भांडणे का लागली ? याचं उत्तर शोधा ! निदान शिल्लक पार्टी वाचवण्यासाठी तरी मदत होईल!"

"भाजपनं आमच्यात भांडणं लावली आहेत. आम्ही भांडतोय भाजप एसीत बघून मज्जा बघतयं. जे चाललं हे योग्य आहे की नाही, हे जनता पाहत आहेत. हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही. तात्पुरती सत्ता मिळावी, म्हणून त्यांनी विचारसरणी सोडली," अशी टीका बंडखोरांवर रोहित पवारांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली .

शरद पवार यांच्यासोबत राहून तुम्हाला पवार कळले नाही का? तुमच्या भाजपविरोधी भूमिकेचं काय झाले? असे म्हणत त्यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील आणि रोहित पवार या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

रोहित पवार म्हणाले, "साहेबांसोबत राहून काहींना साहेब कळलेच नाही. वळसे-पाटील पवार साहेबासोबत ४० वर्ष सोबत होते,पण त्यांना पवारांची भूमिका कळली नाही. वळसेंच्या वयाचा मान ठेवून काही गोष्टी बोलणार नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT