NCP Crisis : चाळीस वर्ष सोबत राहून वळसेंना पवारांची भूमिका कळली नाही ? ; रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

Rohit Pawar slams Dilip Walse : त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं.''
Sharad Pawar, Dilip Walse Patil
Sharad Pawar, Dilip Walse Patilsarkarnama
Published on
Updated on

Pune : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार आठ नेत्यांसह सहभागी झाली आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार गटातील दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्या गटातील रोहित पवार या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

काल दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांचे आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात वळसे-पाटलांनी रोहित पवारांवर टीका केली. त्याला आज (सोमवारी) रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. रोहित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

Sharad Pawar, Dilip Walse Patil
NCP Crisis : विदर्भातही राष्ट्रवादीत फुट ; माजी केंद्रीय मंत्र्यांनं 'साहेबांची' साथ सोडली, 'दादा' गोटात सहभागी..

"माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही, रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली, असं म्हणत दिलीप वळसे-पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी वळसे-पाटील म्हणाले की, ''त्यांचं वय (रोहित पवार) 37 वर्षे आहे आणि मी राजकारणात येऊन 40 वर्षे झाली आहेत. माझा अनुभव पाहता त्यांचं वयही लहान आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं.''

रोहित पवार म्हणाले, "साहेबांसोबत राहून काहींना साहेब कळलेच नाही. वळसे-पाटील पवार साहेबासोबत ४० वर्ष सोबत होते,पण त्यांना पवारांची भूमिका कळली नाही. वळसेंच्या वयाचा मान ठेवून काही गोष्टी बोलणार नाही,"

"भाजपनं आमच्यात भांडणं लावली आहेत. आम्ही भांडतोय भाजप एसीत बघून मज्जा बघतयं. जे चाललं हे योग्य आहे की नाही, हे जनता पाहत आहेत. हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही. तात्पुरती सत्ता मिळावी, म्हणून त्यांनी विचारसरणी सोडली," अशी टीका राष्ट्रवादीतील बंडखोरांवर रोहित पवारांनी केली आहे.

Sharad Pawar, Dilip Walse Patil
NCP Crisis : विदर्भातही राष्ट्रवादीत फुट ; माजी केंद्रीय मंत्र्यांनं 'साहेबांची' साथ सोडली, 'दादा' गोटात सहभागी..

दिलीप वळसे पाटील म्हणाले होते..

'माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे राहा. माझं कोणतंही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही' हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणीही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com