Supriya Sule Has Warned Shinde government Sarkarnama
पुणे

Supriya Sule: हम करे सो कायदा? सुप्रिया सुळे भडकल्या; शिंदे सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार...

सरकारनामा ब्युरो

Aslam Shanedivan

Pune News: राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असून पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्‍न, पशुखाद्याचे वाढते दराने मेटाकुटीला आला आहे. यातच खाजगी दूध संघांनी दूधाच्या दरात १ रुपयांची कपात केली आहे.

शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. त्यात आता पुन्हा एकदा दूधाच्या दरात घट झाल्यामुळे भरीस भर पडल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सरकारवर (Shinde Government) भडकल्या आहेत. शिंदे-फडणीस-पवार सरकारने दूध दरावरून लवकर तोडगा न काढल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा सुळे यांनी दिला आहे.

सध्या राज्यातील शेतकरी चोहो बाजूंनी मेटाकुटीला आला आहे. यादरम्यान हम करे सो कायदा म्हणत खाजगी दूध संघांनी दूध दरात प्रतिलीटर १ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला दूध उत्पादक आणखीच अडचणीत आला आहे.

राज्यात यंदा उन्हाच्या तडाख्यामुळे दुधाच्या दरात तीस टक्क्यांपर्यंत घट झाली. दुष्काळाचे सावट गडद होत असताना जनावऱ्यांच्या चाऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. पाण्याची समस्या निर्माण झाली. चाऱ्याचे दर वाढले असतानाच पशुखाद्याचे दर देखील भडकले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. मात्र यात देखील आता कपात करण्यात आली आहे. पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले असून दूधाच्या कमी झालेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत पावले उचलावी, असे सुळे यांनी एक्सवर म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खाजगी दूध संघानी दूधाच्या दरात १ रूपयांची केलेली कपात ही संगनमताने केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा दूधाच्या दरात घसरण झाली आहे. राज्य सरकारने ३४ रुपये प्रतिलीटर दर निश्चित केले असतानाही दूधाचे दर प्रतिलिटर २५ रूपयांवर आले आहेत. याप्रकरणी पशूसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष घालावे. अन्यथा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह किसान सभेला रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT