Ravindra Dhangekar: खबर पक्की, विजय नक्की; धंगेकर समर्थकांचे सेलिब्रेशन

Ravindra Dhangekar supporters Celebration: एक ध्येयाने प्रेरित होऊन, प्रामाणिकपणे जीवाचे रान केलेला कार्यकर्ताच असे फ्लेक्स लावू शकतो.. होय अमोल.. खबर पक्की आहे..! असे लिहण्यात आले आहे.
Ravindra Dhangekar supporters Celebration
Ravindra Dhangekar supporters CelebrationSarkarnama

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास राहिले असताना आता उमेदवारांच्या समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या समर्थकांना आपलाच नेता बाजी मारणार असून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास वाटत आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील पर्वती येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याने फ्लेक्सबाजी करून पुणे लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हेच जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत "खबर पक्की" "विजय नक्की" अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत.

Ravindra Dhangekar supporters Celebration
Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा पोलिस आयुक्तांना फोन? स्वतःच दिले उत्तर

रवींद्र धंगेकर यांच्यासह महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर याबाबत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता.आता याच विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक मतमोजणीला काही तास शिल्लक असतानाच धंगेकरांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी असलेल्या नितीन कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघात लावलात आलेले पोस्टरचे फोटो टाकत घरोघरी मताला पैसे वाटणाऱ्यांमध्ये हे धाडस नसते..आमच्या अमोल जाधवने पर्वती गाव व जनता वसाहत परिसरामध्ये अशा प्रकारचे फ्लेक्स आधीच लावले आहेत.. एक ध्येयाने प्रेरित होऊन, प्रामाणिकपणे जीवाचे रान केलेला कार्यकर्ताच असे फ्लेक्स लावू शकतो.. होय अमोल.. खबर पक्की आहे..! असे लिहण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सरकारनामा'शी बोलताना नितीन कदम म्हणाले, पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये समोरून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात आम्ही याबाबत त्याला वाचा फोडत आंदोलन केलं. यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून धंगेकरांना प्रचंड मतदान झाले आहे. या मतदारसंघातून धंगेकरांना तब्बल 25 हजारांचे लीड मिळणार असून हे लीड त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ज्या प्रकारे पैसे वाटप करण्यात आले आणि त्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये रवींद्र धंगेकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. या मुळे लोकसभेच्या निवडणुकीत धंगेकर यांचा विजय निश्चित असून त्यांच्या या विजयात पर्वतीने मोलाची भूमिका बजावली असल्याचा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com