Maharashtra Olympic Association Sarkarnama
पुणे

Maharashtra Olympic Association controversy : निधीचा हिशोब मिळेना; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या महासचिवाविरोधात गुन्हा

Namdev Shirgaonkar Booked by Pune EOW Maharashtra Olympic News : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन महासचिवाविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अखेर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस आयुक्त विवेक मासाळ यांनी गुन्हा दाखल केला.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने वारंवार हिशोब सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी तो मुदत संपल्यानंतरही हिशोब सादर केलेला नाही. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप उत्तमराव भोंडवे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विवेक मासाळ यांच्याकडे नामदेव शिरगावकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही राज्यातील सर्व खेळांची प्रमुख संघटना असून, ती भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनशी संलग्न आहे.

या संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी स्वतःचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना एकत्र करून अनेक खेळ संघटना स्थापन केल्या असून, त्या संघटनांमार्फत आर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याचा आरोप आहे. सरकारकडून (Government) मिळणारा निधी अपहार करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याची ही त्यांची पद्धत असल्याचे भोंडवे यांनी म्हटले आहे.

मोठ्या निधीचा हिशोब नाही

राज्य सरकारने राष्ट्रीय गेम्ससाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनला मोठा निधी दिला होता. सप्टेंबर 2022मध्ये राष्ट्रीय गेम्ससाठी 3 कोटी 50 लाख रुपये, ऑक्टोबर 2023 मध्ये गोवा राष्ट्रीय गेम्ससाठी 4 कोटी रुपये आणि जानेवारी 2025 मध्ये उत्तराखंड राष्ट्रीय गेम्ससाठी 4 कोटी 95 लाख रुपये, असा एकूण 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी सरकारने दिला होता.

नोटीस बजावूनही कार्यवाही नाही

परंतु या खर्चाचा योग्य हिशोब शिरगावकर यांनी सरकारने सादर केलेला नाही. यामुळे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 26 सप्टेंबरला शिरगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून 3 ऑक्टोबरपर्यंत हिशोब सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी ती मुदत संपल्यानंतरही हिशोब सादर केलेला नाही.

पुण्यात कारवाईसाठी आंदोलन

संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि काही खेळाडूंनी पुण्यातील पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. आंदोलनात महासचिवांवर गुन्हा दाखल करून योग्य तपास करावा, अशी मागणी केली होती. पोलिसांनी आता हा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT