Gopichand Padalkar, Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Gopichand Padalkar: मला अजित पवारांच्या मुलांची काळजी वाटते! पडळकरांचे रोहित पवारांना प्रत्युत्तर

BJP MLA Gopichand Padalkar slams MLA Rohit Pawar: मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे.पण या रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करण्याची आवश्यकता असल्याचा खोचक सल्ला पडळकर यांनी दिला.

Sudesh Mitkar

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 'बेन्टेक्स' म्हणत जोरदार टीका केली होती. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील हे सोना आहेत. मात्र काही बेन्टेक्स लोक या ठिकाणी फिरत असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर याच्यावर रोहित पवारांनी टीका केली होती. त्याला आता पडळकर यांनी देखील उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, "चंद्रकांतदादा, तुम्ही भाजपचे खरे सोनं आहात. तुमच्यासारखे नेते राजकारणात राजकारण आणि समाजकारणात समाजकारण करतात.या जिल्ह्यात काही 'बेन्टेक्स'चे लोक फिरत आहेत. ते खालच्या स्तरावर जाऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे या 'बेन्टेक्स'च्या सोन्याचे काय करायचे, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे."

टिकेला गोपीचंद पडळकर यांचे उत्तर

पडळकर म्हणाले, मुळात डुप्लिकेटपणा हा पवारांच्यात ठासून भरला आहे. रोहित पवार आज्यांवर म्हणजे शरद पवारांवर गेला असून त्याच्या आजोबांनी गेली 50 वर्षे सोनं म्हणून पितळ विकले आहे. चिंध्या पांघरुण सोनं विकता येत नाही, पण सोनं पांघरुण चिंध्या विकता येतात, या म्हणीप्रमाणे चिंध्या विकण्याचा धंदा पवारांनी केला असल्याची टीका पडळकर यांनी केली.

कालच रोहित पवारांची त्यांच्या चुलत्यांनीच तू कसा निवडून आलाय म्हणत, त्याची अब्रू काढली आहे. मला काळजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पोरांची वाटत आहे. कारण रोहित पवार हेऔरंगजेबाच्या वृत्तीचा आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा, भावांचा घात केला होता. यामध्ये अजित पवार पुरून उरणारे असल्यामुळे टिकलेत. परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते कारण रोहित पवार औरंगजेबासारखी कृती भविष्यात अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल, अशी मला शंका आहे. अशी टीका पडळकर यांनी केली.

मला चिंता करायची गरज नाही, मी पवारांना कसाही असातसा, उलटा-पुलटा पुरून उरलेला आहे. मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे.पण या रोहित पवारांची चिंता अजित पवारांनी करण्याची आवश्यकता असल्याचा खोचक सल्ला पडळकर यांनी दिला.

रोहित पवाराला वाटते की त्याने सरकारच्या नाकात दम आणलाय. पण अशी परिस्थिती नाही आहे. अधिवेशन काळात रोहित पवार पत्रकार मित्र, सिक्युरिटी गार्डच्याही आधी येत होते. कारण त्यांना माहित होतं की, संजय राऊतांपूर्वी बोललं तरच आपली बातमी लागेल. मात्र मिडियामध्ये बातमी लागली म्हणजे शासनाच्या नाकात दम आणला असं होत नाही.

हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ लोकात कधी जाणार? गावात गेल्यानंतर प्रश्न कळतात, हे गावात जाणार कधी? पिगूच्या कोंबडीप्रमाणे चार पावलं चाललं की त्याला धापा लागतात, आणि त्याला वाटते की राज्यातल्या लोकांचं काम करतोय. रोहित पवारांनी आपला मतदार संघ शाबूत ठेवावा. आता पोस्टल बॅलेटवर निवडून आलेत, उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही. मी ठासून त्याच्या विरोधात काम करायला पूर्ण क्षमतेने तयार आहे.अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीत स्वतःचे आमदारकी घालून बसाल.त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या गोपीचंद ची काळजी घ्यायला आम्ही सक्षम आहोत, अशी टीका पडळकर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT