Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांचा नुकताच साखरपुडा झाला. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. युगेंद्र यांच्या आत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबात येणाऱ्या नव्या सुनंच नाव सोशल मीडियावर शेअर केलं आहे. येत्या काही दिवसात पवार कुटुंबामध्ये यंदा दोन विवाहसोहळे होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीचा फोटो फेसबूकवर शेअर करीत नव्या सुनेचं स्वागत करीत दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. तनिष्का प्रभू यांच्यासोबत युगेंद्र हे विवाह बंधनात अडकणार आहेत.
सुप्रियाताईंना शेअर केलेल्या फोटोत तनिष्का ही युगेंद्र यांच्यासोबत बोटातील अंगठी दाखविताना दिसत आहे. युगेंद्र पवार यांच्या वाढदिवस नुकतेच झाला, त्यांच्या वाढदिवशी शरद पवार यांनी युगेंद्र यांना अक्षता टाकायची संधी कधी देताय? असे विचारले होते. त्यानंतर युगेंद्र अन् तनिष्का यांचा साखरपुडा झाल्याचे सुळे यांनी सांगितले.
सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे - माझा भाचा युगेंद्रचा साखरपुडा तनिष्काशी झाला आहे! त्यांना आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकत्र राहावे, अशी शुभेच्छा. तनिष्काचे कुटुंबात स्वागत करताना खूप आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत.
एप्रिलमध्येमध्ये अजितदादांचे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुडा होण्याआधी जय पवार अन् ऋतुजा यांनी मोदीबागेतील घरी आजोबा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता. सुप्रिया सुळे यांनी या साखरपुडा सोहळ्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते.
युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू या मुंबईच्या आहेतय परदेशात त्यांचे शिक्षण झाले असून फायनान्समध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.