Ajit Pawar: ठाकरे बंधूंच्या मोर्चांवर अजितदादाचं मोठं विधान; आजच्या कॅबिनेटमध्ये घेणार निर्णय?

Ajit Pawar Clarifies Stand on Hindi Language Mandate:"हिंदी बाबत मी माझी भूमिका सातत्याने मांडली आहे. मातृभाषा मराठीची सक्तीची केली आहे. हिंदीच्या सक्तीबाबत आज आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. पहिलीपासून मातृभाषा शिकवणे गरजेचे आहे. तर पाचवीपासून हिंदी शिकवली गेली पाहिजे,"
Uddhav Thackrey & Raj Thackerey
Uddhav Thackrey & Raj ThackereySarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रात हिंदी सक्ती नको, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांचा एकत्र मोर्चा 5 जुलैला आहे. यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी बैठका सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चांविषयी मोठे विधान करीत हिंदी सक्ती विषयाबाबत कॅबिनेट बैठकीक निर्णय घेणार असल्याचे संकेत अजितदादांनी दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हिंदी सक्तीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अजितदादांना सूचक विधान केले आहे. आपण मोर्चात सहभागी होणार आहेत का? यावर अजितदादा म्हणाले, "मोर्चांची वेळ येऊ नये,यासाठी आमचा प्रयत्न आहे," असे ते म्हणाले. आजच्या कॅबिनेट बैठक हिंदी सक्तीबाबत आणखी नवीन जीआर काढण्यात येईल , किंवा त्याच पुन्हा दुरुस्ती करण्यात येईल, अशी शक्यता आहे.

मराठी-हिंदीबाबत अजित पवार म्हणाले, "हिंदी बाबत मी माझी भूमिका सातत्याने मांडली आहे. मातृभाषा मराठीची सक्तीची केली आहे. हिंदीच्या सक्तीबाबत आज आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करणार आहोत. पहिलीपासून मातृभाषा शिकवणे गरजेचे आहे. तर पाचवीपासून हिंदी शिकवली गेली पाहिजे,"

Uddhav Thackrey & Raj Thackerey
Political Horoscope: युती, आघाडीबाबत संभ्रम वाढणार! मोठ्या प्रमाणावर बंडखोरी

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या तयारीला आता वेग आला आहे. मोर्चाचा मार्ग त्यासोबतच मोर्चाची वेळ यासंबंधी निर्णय लवकरच होणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या चर्चा भेटीगाठी आता सुरू झाल्या आहेत. यानंतर आता दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांवर या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली.

मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज (29 जून) बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता मुंबईतील राजगड या मनसे पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेव ठाकरे पक्षाचे बाळा परब आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात आंदोलनाच्या तयारीसाठी कल्याण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोंबिवलीत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी तीन वाजता हिंदी सक्तीबाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com