Raj Thackeray | Uddhav Thackeray sarkarnama
पुणे

Pune MNS News: #तू_मेरा_भाई_हैं ; ठाकरें बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला मनसेकडून चोप; काय म्हटलं होते...

Raj Thackeray Uddhav Controversy Post: पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या गेटपासून बाजूला करत रस्त्यावर नेले. त्यानंतर पोलिसांनी केदार सोमण याला ताब्यात घेतले.

Sudesh Mitkar

Pune News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आज कोथरूड भागात मोठा गोंधळ घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केदार सोमण या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांनी थेट धडक दिली. त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाव्य राडा टाळला. ही संपूर्ण घटना कोथरूड येथील इंद्रधनुष सोसायटीमध्ये घडली. केदार सोमण या स्थानिक रहिवाशाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील मनसे नेते आणि प्रवक्ते हेमंत संभूस यांनी ती गंभीरपणे घेतली. सोमण यांचा पत्ता शोधून आज सकाळी थेट त्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले.

सुमन याने दरवाजा उघडण्यास नकार दिल्यामुळे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या गेटपासून बाजूला करत रस्त्यावर नेले. त्यानंतर पोलिसांनी केदार सोमण याला ताब्यात घेतले. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिसांनी सोमण याला गाडीत बसवून नेत असताना कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर चालून जाऊन गोंधळ घातला तसेच सोमण याला चोप देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणामुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सोमण याची पोस्ट जशीच्या तशी

रात्री हाल्फ खंबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा

#तू_मेरा_भाई_हैं

(उठा रात्री पण घरीच बसून वाईन प्यायचा, घराबाहेर न पाडण्याचे व्रत, अखंड होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT