Pratap Patil Chikhlikar: मॉर्निंग वॉक, आहार, पुरेशी विश्रांती हाच प्रताप पाटील चिखलीकरांच्या आरोग्याचा मंत्र

MLA Pratap Patil Chikhlikar Fitness Funda: नेत्यांचा फिटनेस: कामाचा व्याप मोठा असल्यामुळे वयोमानानुसार पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती; तसेच आरोग्य चांगले राहावे याकरिता सकारात्मक विचार अंगी बाळगणे आवश्यक आहे.
MLA Pratap Patil Chikhlikar Fitness Funda
MLA Pratap Patil Chikhlikar Fitness FundaSarkarnama
Published on
Updated on

नेत्यांचा फिटनेस : मागील ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८७-८८ मध्ये युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदापासून राजकारणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर १९८९ला चिखली गावचा सरपंच आणि १९९० मध्ये काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आणि त्यानंतर आजतागायत सातत्याने राजकारण, समाजकारणात सक्रिय राहून विविध खेळांची आवड जोपासत सकाळी उठून वॉकिंग करणे, योगा करणे तसेच सात्त्विक आहार हाच आरोग्याचा मूलमंत्र असल्याचे कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (MLA Pratap Patil Chikhlikar) यांनी आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडताना सांगितले.

मी सकाळी साडेपाचला उठून दिवसाची सुरुवात करतो, त्यानंतर असेल त्या ठिकाणी काही वेळ वॉकिंग आणि योगही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर सकाळी आठ वाजता तयार होऊन मतदारसंघातून तसेच अन्य कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतो. दिवसभरात किमान तीनशे ते साडेतीनशे व्यक्ती विविध प्रश्न घेऊन येतात. त्या सोडवण्याचा नेहमीच माझा प्रयत्न असतो.

वारकरी संप्रदायाचा अनुयायी असल्यामुळे मी शुद्ध शाकाहारी आहार घेत असून यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी दिवसभर ऊर्जा मिळते. कामाचा व्याप मोठा असल्याने झोपण्यासाठी रात्री उशीर होतो, तरी सकाळी किमान साडेपाच वाजताच्या दरम्यान उठून आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळचे फिरणे किंवा योग करण्याचा माझा प्रयत्न असतो.

कामाचा व्याप मोठा असल्यामुळे वयोमानानुसार पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती; तसेच आरोग्य चांगले राहावे याकरिता सकारात्मक विचार अंगी बाळगणे आवश्यक आहे. वय वाढत आहे, तसतसे शरीर अधिक फिट राहण्यासाठी नियमित वॉकिंग करणे, योग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

MLA Pratap Patil Chikhlikar Fitness Funda
Hindi Imposition: डॉ. नरेंद्र जाधव हे BJP अन् RSSचे निकटवर्तीय;  त्रिभाषा समितीला डॉ. दीपक पवार यांचा विरोध

मी नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये असताना १९९०च्या दशकामध्ये दोन खेळांमध्ये टू स्टार आणि फाईव्ह स्टार हा विशेष सन्मान मिळवला. त्यामुळे मला लहानपणीच शालेय जीवनापासून व्हॉलीबॉल आणि कबड्डी या खेळांची आवड आहे. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या विविध स्पर्धेमध्येही भाग घेऊन पारितोषिके मिळवली होती.

आतापर्यंत सोळा निवडणुका जिंकल्या

मी राजकारणात आल्यापासून आजपर्यंत विधानसभा, लोकसभा व विविध प्रकारच्या एकूण १८ निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी तब्बल १६ निवडणुका जिंकल्या असून केवळ दोन निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. दोन निवडणुकीतील पराभवानंतर खचून न जाता नव्या जोमाने संघटन बांधणी करून पुन्हा यश मिळवले आहे.

सात तास झोपेचा डॉक्टरांनी दिला सल्ला

सातत्याने दौरे मतदारांच्या गाठीभेटी घेणे; तसेच कधी-कधी वेळेवर जेवणही होत नसून झोपही अपुरी होते. त्यामुळे आरोग्य चांगले राहावे, यासाठी डॉक्टरांनी सात तास तरी झोपण्याचा सल्ला दिला आहे. परंतु वेळेअभावी पाच तासच झोप होते. समाजकारण व राजकारणाचाही वारसा या क्षेत्रात सक्रिय राहून जपला आहे. जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढल्याने काम वाढले तरीही रोजच्या या धावपळीच्या दिनक्रमात मी माझ्या फिटनेसकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.

पहाटे होते दिवसाची सुरुवात

रोजच्या कामात कितीही व्यस्त असलो, तरीही दिवसाची सुरुवात मात्र कटाक्षाने नियमित सकाळी साडेपाचलाच होते. उठल्यावर थोडा वेळ वॉकिंग आणि मिळेल तसा वेळ योग करण्याचा माझा प्रयत्न असतो. रात्री झोपण्यास उशीर झाल्यावर कधीकधी उठायला उशीर होतो. पण, बहुधा पहाटे ठरलेल्या वेळेवर उठतो. त्यानंतर नियमित कामांना सुरुवात करतो.

सात्त्विक आहारावरही नियंत्रण

रोजच्या आहारात मी सात्त्विक जेवणाला प्राधान्य देतो. हॉटेलचे मसालेदार खाणे; तसेच चहा, कॉफी टाळण्याचा प्रयत्न असतो. जेवणात ज्वारीची भाकरी, पालेभाज्यांचा असतात. मेथीची भाजी, पिठले, ठेचा मी आवडीने खातो.

तरुण वयामध्ये कधी-कधी व्यायाम टाळला तरी चालेल परंतु वयोमानानुसार सकाळी उठल्यानंतर नियमित चारते पाच किलोमीटर चालणे आणि योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. चालले किंवा योग केल्याने दिवसभर उत्साह राहून उर्जा मिळते. त्यामुळे दैनंदिन जीवनात आरोग्य जपण्यासाठी पुरेसा व्यायाम, खेळ, सात्त्विक आहार व पुरेशी विश्रांती हाच फिटनेसचा मंत्र कुणालाही उपयुक्त ठरणार आहे.

(शब्दांकनः रामेश्वर काकडे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com