Maharashtra SIR: निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्याचा आदेश धुडकावणे कर्वेनगर भागातील शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी महापालिकेच्या पाच आणि एका खासगी शाळेतील दोन अशा सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी मोहिमेच्या पर्यवेक्षक मनीषा गुलाबराव मातेरे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिस ठाण्यात लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल उदमले यांनी कर्वेनगर परिसरातील शाळांमधील या सात शिक्षकांना मतदार नोंदणीच्या कामासाठी लेखी आदेश दिले होते. मात्र, या शिक्षकांनी कामात कुचराई करत आदेशाचे पालन केले नाही. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.