Annamalai Politics: तामिळनाडूच्या राजकारणात नव पर्व! अब्दुल कलाम आले केंद्रस्थानी; भाजपची साथ सोडल्यानंतर अण्णामलाईंची मोठी घोषणा

Annamalai Politics: तामिळनाडूत भाजपची वाताहात झाली असून माजी प्रदेशाध्यक्ष आण्णामलाई यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
APJ Abdul Kalam_Annamalai
APJ Abdul Kalam_Annamalai
Published on
Updated on

Annamalai Politics: तामिळनाडूत भाजपची वाताहात झाली असून माजी प्रदेशाध्यक्ष आण्णामलाई यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्याचबरोबर नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. पण त्यांच्या या नव्या पक्षाची आणि राजकारणाची खासियतची आता चर्चा सुरु आहे. कारण देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांवर चालण्याची आणि आपलं राजकारण त्यांच्या विचारांवर केंद्रीत करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तामिळनाडूच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

APJ Abdul Kalam_Annamalai
Sattar Politics : विधान परिषदेतून माघार, जिल्हा बँकेत एंट्री! सत्तारांची नवी राजकीय खेळी; म्हणाले, 'सहज निवडून...'

भाजप फुटली

तामिळनाडूत भाजपसाठी मोठी पडझड झाली असून पक्षच फुटला आहे. अण्णामलाई यांनी वेगळी चूल मांडण्याची घोषणा केल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत, तसंच ते सर्वजण अण्णामलाई यांच्यासोबत नव्या पक्षात सामिल होणार आहेत.

कलाम केंद्रस्थानी

भाजपतून बाहेर पडल्यानंतर के. अण्णामलाई यांनी आपण आता नवी राजकीय चळवळ सुरु करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर हळूहळू त्याचं राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल असंही सांगितलं. पण ही राजकीय चळवळीची मुल्ये आणि राजकारण हे एपीजे अब्दुल कलाम यांना केंद्रस्थानी मानून चालवली जाणार आहे. त्यामुळं आजवर तामिळनाडूच्या राजकारणात एक राजकीय विचार म्हणून वेगळा पर्याय तो ही तामिळनाडूचे सुपुत्र आणि देशाच्या अंतराळ संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार होय. त्यामुळं अण्णामलाई यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळल्याचंही बोललं जात आहे.

APJ Abdul Kalam_Annamalai
Mamata Banarjee: ममता बॅनर्जींना आणखी एक झटका! 'या' निकटवर्तीयानंही दिला अचानक राजीनामा; म्हटलं, आता जबाबदाऱ्या...

कलामच का?

अब्दुल कलाम यांच्या विचारांची चळवळ का? याचं उत्तर देताना आण्णामलाई यांनी म्हटलं की, कलाम हे हुशारी, समर्पण, बलिदान, एकता आणि राष्ट्रीयत्वाचं प्रतिक आहेत. कलामांना तामिळनाडूच्या राजकीय नरेटिव्हमध्ये कलामांना आणणं हे तामिळी आणि राष्ट्रीयत्वासाठी महत्वाचं आहे. त्यामुळं आजवर कोणाचंही अब्दुल कलमांच्या या गुणांचा राजकारणासाठी वापर करण्यासंदर्भात लक्ष गेलं नव्हतं ते आण्णमलाई यांना जमलं त्यामुळं त्यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचं सांगितलं जात आहे.

APJ Abdul Kalam_Annamalai
Farmer Loan Waiver: सरकारची कर्जमाफी योजना फसवी! केवळ दोन-तीन टक्के शेतकर्‍यांनाच मिळणार लाभ?

कलामांच्या नावानं प्रशिक्षण आणि संशोधन संस्था

यावेळी जाहीर सभेत बोलताना आण्णामलाई म्हणाले, आपण जी चळवळ सुरु करणार आहोत त्याला वुई दि लीडर असं नाव असेल. जे अब्दुल कालाम यांना केंद्रस्थानी ठेवून मुल्य आणि राजकारण यासाठी एक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोईम्बतूरमध्ये उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com