TET Exam Sarkarnama
पुणे

Maharashtra TET 2026 : शिक्षकांनो तयार रहा! टीईटी परीक्षेची तारीख जाहीर, शुक्रवारपासून करा अर्ज

Maharashtra TET Exam : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

सरकारनामा ब्यूरो

TET Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून (ता. 27) सुरू होत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर दोन या पद्धतीने परीक्षा घेतली जाते.

त्यानुसार 21 जून रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळेत पेपर एक, तर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत पेपर दोन होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, अन्य माहिती परीक्षा परिषदेच्या ‘https://mscepune.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

...तर वेळापत्रकात बदल

प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शिक्षकांना टीईटी परीक्षा पास करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT