Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेण्यात येत आहे. त्यानुसार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची मतदारसंघ निहाय चाचपणी करण्यात येत आहे. \
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. भाजप (Pune BJP)मात्र अशाप्रकारे इच्छुकांची अर्ज मागवत नाहीत, भाजपमध्ये उमेदवार निवडण्याची वेगळी प्रक्रिया असून ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून महाराष्ट्रातील 288 जागांवर इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील महाराष्ट्रभरातून इच्छुकांचे अर्ज मागवले. त्यानुसार पक्षाकडे तब्बल 1350 आज आल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या तोंडावरती ऐनवेळेस इनकमिंग न झाल्यास याच इच्छुकांच्या अर्ज मधून एक उमेदवार विधानसभा निवडणुकीची तिकिटासाठी निवडला जातो.
याचा उलट भाजपमध्ये वेगळी प्रक्रिया असून सध्या ही प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियानुसार आता एक ऑक्टोबर रोजी पुणे शहरातील उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक पुण्यामध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
या चर्चातून पदाधिकाऱ्या व कार्यकर्त्यांचे आगामी विधानसभा निवडणुकी साठीच्या उमेदवारांनी बाबत मत जाणून घेण्यात येत आहेत. त्यानुसार आता एक ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमध्ये केंद्र, प्रदेश, शहर आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकारी असे मिळून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ६० ते ७० जणांना आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांना मते देण्यास सांगण्यात येणार आहे.
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रातून आलेले निरीक्षक पसंती क्रमानुसार तीन नावे प्रदेश भाजपाला पाठवतील. नंतर भाजपा प्रदेश कोण ही नावे पुढे केंद्र स्तरावर पाठवण्यात येतील. त्यानंतर वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नाव आणि पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण यांच्या आधारावर ज्याची निवडणूक जिंकण्याची जास्त क्षमता असेल त्यालाच तिकीट जाहीर करण्यात येईल, असं भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.