पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट (eknath shinde) यांच्यातील न्यायालयीन संघर्षात काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे आता या संघर्षातील पुढच्या टप्प्यातील या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. (eknath shinde news update)
शिवसेना कुणाची या प्रश्नाचे उत्तर पुढील सुनावणीत मिळू शकते. या संघर्षात न्याायलयाच्या निर्णयावरच सर्वकाही अवलंबून आहे. यात निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवले तर काय होऊ शकते? अशा स्थितीत कुणाला नवीन पक्षाची नोंदणी करावी लागेल? याबाबत घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (ulhas bapat)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
उल्हास बापट म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, निवडणूक आयोगाने निर्णय देऊच नये. आयोगाला त्यांची प्रक्रिया सुरूच ठेवता येईल पण निर्णय देता येणार नाही. चिन्ह गोठवताही येणार नाही. यात आणखी दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे राज्यपालांचे अधिकार काय आहेत? आणि दुसरा म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याचा अर्थ काय आहे?"
"राज्यापालांचे अधिकार काय, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्लानुसार वागणं आवश्यक आहे का,पक्षांतर बंदी कायद्याचा नेमका अर्थ काय,खरा पक्ष कुठला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व विषय घटनापीठाकडून घ्यायला पाहिजे. आता 141 कलमाखाली जो निर्णय लागेल तो हायकोर्टाला बंधनकारक राहील," असे बापट म्हणाले.
"देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय होत आहे. चंद्रचूड हे घटनापीठाचे मुख्य न्यायाधीश आहेत. हे कायदा क्षेत्रातील मोठे अधिकारी आहेत. तीन आठवडे न्यायाधीश अभ्यास करतील. त्यानंतर काय तो निर्णय होईल. 16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी शिवसेनेची मागणी आहे. असं झाल्यास एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते," अशी शक्यता बापट यांनी व्यक्त केली आहे.
"राज्यघटनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मूळ राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंकडे आहे. आणि विधीमंडळ पक्ष शिंदेंकडे आहे. पक्षांतरबंदी कायदा हा मूळ राजकीय पक्षाला लागू होतो, त्यामुळे त्यांनी अपात्र केल्यास हे 16 आमदार अपात्र होतात असे मला वाटते. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे आता बघावे लागेल," असे बापट यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.