मुंबई : उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा मुंबईजवळ कार अपघातात नुकताच मृत्यू झाला. त्यांच्या अपघातानंतर राजकीय, सामजिक आणि उद्योग विश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी सायरस मिस्त्री यांच्याबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे,
मिस्त्रीसोबतच्या जवळपास 30 वर्ष जुन्या मैत्रीची आठवण सांगत त्यांनी ही पोस्ट केली आहे.त्यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. सायरस मिस्त्री यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात सुळेंनी एक जुना फोटो शेअर केला आहे. जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
"अजूनही विश्वास बसत नाही. आम्ही सर्व तुमची नेहमीच आठवण ठेवू. रेस्ट इन पीस सायरस,"असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, आमच्यातून तू निघून गेला असलास तरी आमच्या हदयातून जाणार नाही आहेस. रेस्ट इन पीस सायरस.
तीन दिवसांनी केंद्रीय रस्ते,वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या तीन दिवसांत यासंदर्भात आदेश काढला जाणार आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघाताबाबत काही गोष्टी समोर येत आहेत. त्यांनी सीट बेस्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, याचीही चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे.
नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत याबाबत महत्वाची घोषणा केली. कारमध्ये बसलेल्या सर्व लोकांना आता सीट बेल्ट लावणे अनिवार्य असणार आहे. सीट बेल्ट न लावता पकडल्यास दंडही भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
‘याआधी फक्त ड्रायव्हर आणि सहप्रवाशांसाठी सीट बेल्ट न लावल्यास दंड होता, परंतु आम्ही मागील सीटच्या प्रवाशांना देखील सीट बेल्ट लावाने अनिवार्य करणार आहोत’ असे एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.