Mahesh Landge  Sarkarnama
पुणे

भाजप नगरसेवकाच्या राजीनाम्यावर महेश लांडगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मानाने वागविले नाही, असे आरोप वसंत बोराटे (Vasant Borate) यांनी राजीनामा देताना केले होते.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक वसंत बोराटे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षावर आरोपाच्या फैरी झाडत बुधवारी (ता.१६ फेब्रुवारी) आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे (Bhosri) आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मतदारसंघातील ते आहेत. त्यामुळे या राजीनाम्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अपेक्षित होती. ती तशी लगेच आलीही. हा निर्णय अनपेक्षित असल्याचे सांगत बोराटेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लांडगे यांनी म्हटले आहे.

पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मान दिला नाही. सन्मानाने वागविले नाही, असे आरोप बोराटे यांनी राजीनामा देताना केले होते. तरीही त्यांच्यावर वा बोराटे कुटुंबावर राजकीय प्रत्यारोप करणार नाही, असे आमदार लांडगे यांनी स्पष्ट करीत पॉलिटीक्स विथ रिसपेक्टच्या आपल्या तत्वाचे पालन केले. बोराटे हे असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते, असे ते म्हणाले. त्यातून बोराटेंच्या राजीनाम्याने त्यांना काहीसा धक्का बसल्याचेही जाणवले. बोराटेंची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करु मात्र, तसे न झाल्यास भाजपाकडे त्या प्रभागातून अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असा स्पष्ट व थेट इशाराही त्यांनी दिला.

त्याचवेळी मोशीतील बोराटे कुटुंबियांचे माझ्या राजकीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. २०१४ पासून आणि त्यापूर्वीही त्यांनी मला केलेल्या मदतीची परतफेड होवू शकत नाही. त्यामुळे नगरसेवक बोराटे यांच्या निर्णयाबाबत मी कोणतेही राजकीय हेवेदावे करणार नाहीत. कारण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप, हेवे-दावे आणि नाराजी होणे क्रमप्राप्त आहे, असे लांडगे म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT