Medha Kulkarni.jpg Sarkarnama
पुणे

Medha Kulkarni: खासदार मेधा कुलकर्णींना केंद्रात मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या 'समिती'च्या अध्यक्षपदी वर्णी

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे पक्षातील आणि केंद्रातील वजन वाढले आहे.

Sudesh Mitkar

Medha Kulkarni: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे पक्षातील आणि केंद्रातील वजन वाढले आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते कारण म्हणजे त्यांच्यावर थेट केंद्रात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मेधा कुलकर्णी यांची 'विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल' विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत त्यांची या समितीच्या प्रमुखपदी आणि सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले असून ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

देशातील विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित सर्व महत्त्वाची धोरणे, आगामी विधेयके आणि कोट्यवधींच्या विकासकामांचा अभ्यास करून त्यावर अंतिम निर्णय घेण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आता थेट मेधा कुलकर्णी यांच्या खांद्यावर आली आहे. पुण्याच्या माजी आमदार असलेल्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळं त्यांना 'संसदरत्न' पुरस्कारानंही गौरविण्यात आलं आहे. त्यांच्या याच आक्रमक आणि अभ्यासू वृत्तीची दखल घेत केंद्रीय नेतृत्वानं ही मोठी लॉटरी त्यांच्यासाठी काढल्याचं बोललं जात आहे.

या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, "संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळं देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील मोठ्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत थेट योगदान देण्याची संधी मला मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती आणि पर्यावरण संवर्धन या महत्त्वाच्या विषयांवर देशासाठी ठोस काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT