PCMC Illegal hoarding Accident
PCMC Illegal hoarding Accident Sarkarnama
पुणे

PCMC Illegal hoarding Accident: होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट; जमीन मालकाला अटक

सरकारनामा ब्युरो

PCMC Illegal hoarding Accident : वादळी पावसाने सोमवारी (ता.१७) सायंकाळी पिंपरी-चिंचवडमधील रावेत येथे एक अनधिकृत होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी रावेत पोलिसांनी जमीन मालक नामदेव बारकू म्हसुडगे याला अटक केली आहे. (PCMC Illegal hoarding Accident)

या होर्डिंग अपघाताला अजूनही काहीजण कारणीभूत असून ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहेत. या सर्व फरार आरोपींना पकडण्यासाठी रावेर पोलिसांनी बनवली पोलीस पथक बनवल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. (PCMC Political news)

दरम्यान, उद्योगनगरीतील १४०७ पैकी ४३४ होर्डिंग्ज ही अनधिकृत असल्याचे शेखरसिंह यांनी आज सांगितले. तर, शहरात ही संख्या तब्बल बावीसशे असल्याचा दावा शहराचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी करीत आयुक्तांना घरचा आहेर दिला. तसेच या अवैध होर्डिंग्जकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, अशी तोफही त्यांनी डागली. पालिका प्रशासन आणि अनाधिकृत होर्डिंगमालक यांचे आर्थिक देणेघेणे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

होर्डिंग अपघाताला जबाबदार कोण?

पाच निष्पापांचे बळी घेणाऱ्या किवळेतील कालच्या होर्डिंग दुर्घटनेला सर्वस्वी पिंपरी महापालिका जबाबदार असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उभे केलेले बेकायदा दोन मजली जाहिरात फलक हे पालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील खाबुगिरीचे दर्शन आहे, असे ते म्हणाले.

जोपर्यंत अनधिकृत, दुमजली फलक काढले जात नाहीत तोपर्यंत या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची जबाबदारी पालिकेची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. काल पाच बळी जाण्यास पालिकेचा आकाशचिन्ह विभाग आणि तेथील अधिकाऱ्यांची मानसिकता जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

होर्डिंगला छिद्र नसल्याने ते कोसळले?

होर्डिंग घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आज केली. होर्डींग्ज उभारणीतील तांत्रिक चूक त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणली. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग हे त्याला छिद्र नसल्य़ामुळे कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हवा जाऊ शकणारी अशी छिद्रे नसलेली होर्डिंग्ज धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT