Pune News: विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी विविध रणनीती आखण्यात येत आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येक पक्षाचा वेगळा 'गेम प्लॅन' आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात देखील आगामी विधानसभेसाठीची रणनीती सत्ताधारी पक्षांनी आखली असल्याचे दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघाबाबत (Karjat Jamkhed Assembly Election 2024) सत्ताधाऱ्यांनी काही 'गेम प्लॅन' बनवले असल्याची चिंता खुद्द रोहित पवार यांनी बोलून दाखवली. रोहित पवार पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मराठा आंदोलकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी 'जवाब दो' आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, असं आंदोलकांचे मत आहे.
रोहित पवार म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या लोकांकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत.त्याचबरोबर केंद्रात देखील त्यांच्याकडे सत्ता आहे.त्यामुळे सर्वाधिकार त्यांच्याकडे असल्याने सत्तेतील लोकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे,"
सरकारमधील काही लोक मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन यांची भेट घेतात, पण या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील विरोधी पक्षाला दिला जात नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं मात्र सत्तेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे लोक कोर्टात जातात आणि हे आरक्षण हाणून पाडलं जातं, असे रोहित म्हणाले.
महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांचा माणूस असणाऱ्या सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आणि हे आरक्षण हाणून पाडलं. त्यामुळे सत्तेतील लोकांनी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यानंतर विरोधी पक्ष आपली भूमिका मांडतील सांगत आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबाच असल्याचं असं रोहित पवार म्हणाले.
राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर होत असलेला टिकेवर रोहित पवार म्हणाले, 'मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फॅन होतो. मात्र आता ते दिल्लीचा आणि गुजरातचं ऐकायला लागले आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात काय चित्र राहिलं हे सर्वांनीच पाहिलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मत विभागणी करण्यासाठी काही पक्षांची आणि व्यक्तींचा उपयोग करण्यात येत आहे. मात्र जनता अशा नेत्यांना आणि पक्षांना सुपारी बाज असं म्हणतात,"
सत्तेत असलेले लोकांकडून मुद्दामून माझ्या मतदारसंघात काही अपक्ष अथवा पक्षाच्या लोकांना उभ करण्यात येईल जेणेकरून मतं विभागणी होऊन त्याचा फटका बसू शकेल. मात्र सामान्य लोकांना हे सगळं समजलं असल्याचं रोहित पवार म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.