Sanjay Pandey: Video 'खाकी'ला 'खादी'ची भुरळ; 'तिहार'ची हवा खाऊन आलेल्या माजी पोलिस आयुक्तांना व्हायचंय आमदार!

Versova Assembly Election: वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात पांडे नतमस्तक झाले. त्यांनी येथूनच प्रचाराला सुरूवात केली आहे. "आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून प्रचाराची सुरुवात केली आहे.
Sanjay Pandey Will Contest Versova Assembly Election
Sanjay Pandey Will Contest Versova Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics: राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याचा आरोप असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आता खाकी सोडल्यानंतर 'खादीची' भुरळ पडल्याचे दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शड्डू ठोकला आहे.

फेसबुकवर पोस्ट करीत संजय पांडे यांनी वर्सोवातून विधानसभा निवडणूक (Versova Assembly Election 2024) लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काही नेटकऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीवरुन टोलेबाजी केली आहे.

पांडे काल (रविवारी) वर्सोवाच्या झुलेलाल मंदिरात नतमस्तक झाले. त्यांनी येथूनच प्रचाराला सुरूवात केली आहे. "आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू..." असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाच महिने तिहार जेलची हवा खाऊन आलेले संजय पांडे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. कुठल्या पक्षाकडून की अपक्ष लढणार याबाबत त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

Sanjay Pandey Will Contest Versova Assembly Election
Ajit Pawar: Video अजितदादांच्या सुरक्षेत वाढ; मालेगावात माजी आमदाराच्या घरासमोर तगडा पोलिस बंदोबस्त

संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन 30 जून 2022 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त होते.

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने नुकताच गुन्हा दाखल केला होता. सक्तवसुली संचालनालयानेही (ED) पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला होता.

पांडे यांना १९ जुलै २०२२ रोजी त्यांना अटक केली होती. जवळपास पाच महिन्यांनी त्यांची सुटका करण्यात आली. ८ डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी अटींसह जामीन मंजूर केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com