Arrest
Arrest Sarkarnama
पुणे

मंगलदास बांदलांच्या सहकाऱ्याला कोरेगावात सापळा रचून पकडले

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणूकप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अटकेला पाच महिने उलटले. मात्र, त्यांचा सहकारी गुलाब दशरथ पवार (रा. पाटवस्त्ती, ता. शिरूर) हा पाच महिन्यांपासून फरार होता. त्याला शिक्रापूर पोलिसांनी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे सापळा रचून पकडले. त्यांना शिरूर न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. ४ ऑक्टोबर) या प्रकरणातील इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली. (Mangaldas Bandal's accomplice was arrested by the police in Koregaon)

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक फसवणुकीप्रकरणी बांदलांवर शिक्रापूर तसेच पुणे अशा दोन्ही ठिकाणी एकूण चार गुन्हे दाखल आहेत. तत्पूर्वी बांदलांवर सणसवाडी (ता. शिरूर) येथे पाणीचोरी तसेच वढु खुर्द (ता. हवेली) येथील एका जमीन फसवणुकीप्रकरणी एक गुन्हा दाखल होता. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या प्रकरणात एकुण सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. या शिवाय काही आरोप अद्यापही फरार आहेत. शिक्रापूर पोलिस या सर्व आरोपींच्या मागावर असतानाच गुलाब पवार याला कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे जेरबंद करण्यात आले.

गेल्या चार महिन्यांपासून पवार याच्या मागावर सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे यांचे पथक होते. अखेर शुक्रवारी (ता. १) पवार याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पवार याला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यातून तो पळून जाण्याच्या प्रयत्नांत होता.

मंगलदास बांदल यांच्यावर एकुण सात गुन्हे दाखल आहेत. यात पुण्यातील एक व्यावसायिकाला मागितलेल्या खंडणीचा, दुसरा सणसवाडीतील पाणीचोरीचा, तर तिसरा वढु खुर्द येथील जमिनीच्या एका फसवणूक प्रकरणात सहआरोपी असल्याचा आहे. इतर चार गुन्हे हे शिवजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या फसवणुकीच्या प्रकरणातील आहेत. पहिल्या तीन गुन्ह्यांत बांदलांना अटकपूर्व जामीन मंजूर आहे. मात्र, भोसले बॅंकेच्या एकाही प्रकणात त्यांना जामीन मिळालेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT