राष्ट्रीय समाज पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

त्यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय समाज पक्षाचे सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष किशोर वरक यांनी मुंबई येथे नुकतेच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. वरक यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह, काँग्रेसचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांनी वरक यांचे पक्षात स्वागत केले. (Former RSP's Sindhudurg district president Kishor Varak joins Congress)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विजय कदम यांनीही पक्षाला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Nana Patole
गणेश नाईकांना शह देण्यासाठी अजित पवार मैदानात

या वेळी आमदार विकास ठाकरे, माजी आमदार हुसेनबानू खलिफा, प्रवक्ते राजू वाघमारे, युवा नेते विशाल मुत्तेमवार, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, ज्येष्ठ पदाधिकारी दादा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते.

Nana Patole
अमित शहा सहकारमंत्री झाल्यानंतर काय करतील? : शरद पवारांनी केले भाकीत

जिल्हा बॅंक निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीने सोपवली या चार नेत्यांवर!

सावंतवाडी ः आगामी काळात होणारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक व इतर सर्वच निवणुकांची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली असून सावंतवाडीतून बैठका घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी जिल्हा, तालुका, शहरनिहाय बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्याची जबाबदारी ४ जाणत्या नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या जिल्हा बँक बिनविरोध करण्याच्या भूमिकेस आमचा पाठिंबा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले.

सामंत म्हणाले, ‘‘आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आढावा बैठक घेतली असून त्यादृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. जिल्हा बँक निवडणूकीची जबाबदारी ही राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, व्हिक्टर डान्टस, एम. के. गावडे, नंदूशेट घाटे या जाणत्या नेत्यांवर राहणार आहे. जागा वाटपासंदर्भात मित्रपक्षांशी चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किती उमेदवार उभे करायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.’’

सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, निरीक्षक शिवाजी घोगळे, आशिष कदम, हिदायतुल्ला खान उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com