Mangaldas Bandal Sarkarnama
पुणे

Mangaldas Bandal News : फडणवीसांची भेट घेणं मंगलदास बांदल यांना भोवलं; 'वंचित'कडून शिरूर लोकसभेची उमेदवारी रद्द

Chaitanya Machale

Shirur Lok Sabha Constituency : वंचित बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीबरोबरची युती फिसकटल्यानंतर महाराष्ट्राती़ल लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.2 ) 'वंचित'ने पाच नावे जाहीर केली. त्यात शिरूरमध्ये 'वंचित'ने पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिल्याने तेथील निवडणुकीत आता ट्विस्ट आला होता. मात्र, या मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी (ता.5) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर वंचितकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिरूर लोकसभेची बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली आहे.

फडणवीस -बांदल भेट चर्चांना उधाण

शिरूर (Shirur) लोकसभेसाठी वंचितने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती. यापूर्वी बांदल हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तसेच त्यानंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून त्यांनी विधानसभेची निवडणूकदेखील लढविली होती. शिरूर लोकसभेसाठी ते इच्छुक होते. यासाठी काही दिवसांपूर्वी बांदल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेटदेखील घेतली होती. शिरूरची जागा महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडे असल्याचे फडणवीस यांनी बांदल यांना सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो क

उमेदवारी मिळताच बांदलांनी केला होता हा दावा...

"भाजप वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी सध्या संविधान वाचविण्याची मोहीम उघडली आहे. त्यामुळे ते लिहिलेल्यांच्या ( भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) नातवाने ( प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर )उमेदवारी देणे यापेक्षा आणखी काय हवं," अशी पहिली प्रतिक्रिया पैलवान बांदल ( Mangaldas Bandal ) यांनी 'वंचित'ने त्यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर 'सरकारनामा'ला दिली.

कोल्हे ( Amol Kolhe ) हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नाहीत, तर आढळराव हे आयात उमेदवार आहेत. त्या दोघांनाही या पैलवानाचा फटका सहन होणार नाही. सहाही विधानसभा मतदारसंघांत आपली ताकद आहे," असा दावा बांदलांनी केला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT