MNS News: मनसेच्या महायुतीतील 'एन्ट्री'ला ब्रेक, गुढीपाडवा मेळावा काही दिवसांवर; पण त्याआधीच मोठी राजकीय घडामोड!

Raj Thackeray News: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.
Raj Thackeray, Sanjay Shirsat
Raj Thackeray, Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray Sanjay Shirsat Meeting: लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Election रणधुमाळी देशभरात पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी युती-आघाड्यातील नेते आपापल्या समविचारी पक्षांचा आणि नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

अशातच आज शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट Sanjay Shirsat यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आहे. शिरसाट आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महायुतीमध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray सामील होणार की नाही याबाबतच्या सुरू आहेत. राज ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाहांची Amit shaha यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे महायुतीसोबत येणार असून, राज यांनी दोन जागांवर दावा केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, मनसेने MNS कोणतीही भूमिका जाहीर न करत सस्पेन्स कायम ठेवला आहे. अशातच आता शिंदेंच्या नेत्याने राज यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा मनसे युतीत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु, राज ठाकरेंच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण शिरसाट Sanjay Shirsat यांनी दिलं आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले, राज ठाकरेंसोबत आधीपासून आमचे वेगळे संबंध आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात सभा व्हायच्या, त्यावेळी राज ठाकरे आवर्जून त्यांच्यासोबत असायचे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे मनभेद नसायला पाहिजेत, त्याप्रमाणे आमच्यातही कोणताही मनभेद नाही. खूप दिवसांची इच्छा होती राज ठाकरेंना भेटायची म्हणून त्यांची भेट घेतली. परंतु या भेटीत राजकीय गप्पा झाल्या नाहीत. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. परंतु आता पुढे काय करायला पाहिजे, यांनी काय करायला पाहिजे याबाबत चर्चा झाली नाही."

Raj Thackeray, Sanjay Shirsat
Devendra Fadnavis News : "लोकसभेच्या रणधुमाळीत जयंत पाटील कुठे आहेत?" फडणवीसांनी मोजक्या शब्दांतच विषय संपवला

तसेच आजच्या बैठकीत मी कोणताही प्रस्ताव आणला नव्हता, प्रस्तावाचे काम वरिष्ठ पातळीवर होत असते. परंतु, राज यांना मी पहिल्यापासून सांगतो साहेब तुम्ही युतीसोबत यायला पाहिजे. तुमच्यासाठी रेड कार्पेट टाकणारे आम्ही असणार आहोत. शिवाय ते युतीसोबत आल्यास नक्कीच फायदा होईल आमची ताकद वाढेल आणि जागा जास्त निवडून येतील, असंही शिरसाट म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

(Edited By Jagdish Patil)

R

Raj Thackeray, Sanjay Shirsat
Loksabha Election 2024 : आता घड्याळाची गरज पडत नाही, मोबाईलमध्ये वेळ समजते : सुप्रिया सुळेंचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com