Ajit Pawar, Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil : अजित पवारांच्या आमदाराची जरांगेंना भेटण्याची धडपड का?

Sudesh Mitkar

Pune Political News :

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांनी शेवटच्या टप्प्यातील लढ्यासाठी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. जरांगे-पाटील यांची पदयात्रेचा काल पुण्यातील खराडी येथे मुक्कामी होता. त्यानंतर आज सकाळी त्यांचे पुढचे पाऊल मुंबईच्या दिशेने पडले आहे. यात बाब निदर्शनास आली ती म्हणजे अजित पवारांचे आमदार जरांगे-पाटील यांची भेट घेण्याची धडपड करीत आहेत.

मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची मागणी आहे. यासाठी जरांगे-पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई (Mumbai) अशी पदयात्रा सुरू केली आहे. आज सकाळी पुण्याच्या खराडी परिसरातून पदयात्रेला सुरुवात झाली. आज पदयात्रेचा मुक्काम लोणावळ्यात आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जरांगे-पाटील यांची पदयात्रा निघण्यापूर्वी ठाण्यातील एका भाषणादरम्यान मुंबईच्या दिशेने कोणी आले तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा दिला होता. या वक्तव्यावर मराठा समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

पदयात्रेपासून सर्वपक्षीय नेतेमंडळी दूरच

20 जानेवारीला अंतरवाली सराटीमधून निघालेली ही पदयात्रा बीड, अहमदनगरमार्गे पुण्यात पोहोचली आहे. पण पदयात्रेपासून सर्वपक्षीय स्थानिक नेते, आमदार, खासदार यांनी स्वतःला दूर ठेवल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांची मराठा आंदोलन म्हणून जरांगे खराडी येथे आले असता त्यांना भेटण्याची धडपड पाहायला मिळाली. गर्दीमधून त्यांनी जरांगे-पाटील यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मुख्यमंत्री नाराज, चर्चा बंद?

मराठा आंदोलकांनी मुंबईत येऊ नये, यासाठी सरकारचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीदेखील जरांगे-पाटील यांना पदयात्रा न काढण्याचे आवाहन केले होते. आरक्षणासाठी सर्व ती प्रक्रिया सुरू असूनही जरांगे आंदोलनावर ठाम राहिले. त्यामुळे सरकारमधील काही मंत्र्यांनी जरांगेंशी चर्चा न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती मिळते. राज्य सरकार आणि जरांगेंमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. परिणामी नाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटलांशी चर्चेचे दरवाजे जवळपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT