अनिल कदम
Sangli : जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी 4 हजार 995 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच मंगळवारपासून काम सुरू झाले. जिल्ह्यातील सर्वेक्षण सात दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या पत्रानुसार शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणासाठी (survey) जिल्ह्यात 85 नोडल अधिकारी आणि 4 हजार 995 प्रगणकांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम करणारे प्रगणक व पर्यवेक्षकांना नोडल अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रगणक यांना मागासवर्ग आयोग यांच्याकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रगणक घरोघरी जाऊन मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वेक्षण करण्याचे काम मंगळवारी दुपारपासून सुरू झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सर्वेक्षणामध्ये मराठा (Maratha) सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुढील सात दिवसांत जिल्ह्यातील सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे, त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अहवाल पाठविला जाईल. नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले.
दरम्यान, मागील चार महिन्यांत जिल्ह्यात 92 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 38 हजार 468 कुणबी मराठा दाखले आढळून आले. ज्यांचा कुणबीचा दाखला आढळून आला आहे, त्याच्यापैकी काहींनी दाखल्याची मागणी केली, त्यांना आतापर्यंत 142 जणांना कुणबी मराठा दाखले देण्यात आले आहेत.
मराठा कुणबी नोंदींची यादी गावात तलाठी कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात याद्या प्रसिद्ध केल्या जातील. ज्यांचे पुरावे आढळले आहेत, त्यांना दाखले देण्यात येतील. ज्यांना वंशावळ आढळलेली नाही, परंतु महसूल विभागाकडील पुराव्यानुसार कुणबीचे दाखले दिले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.