Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Maratha Reservation : जरांगेंच्या मोर्चाचा उद्या पुणे मुक्काम; दंगल नियंत्रण पथक सज्ज

Manoj Jarange Patil March to Mumbai : पुणे मुक्कामासाठी पोलिसांची जय्यत तयारी

Sudesh Mitkar

Pune News :

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या वर्षी ऑगस्टपासून तीव्र लढा सुरू केला आहे आणि आता २० जानेवारीपासून चलो मुंबईचा नारा देत मुंबईकडे कूच केले आहे. जरांगे-पाटलांसोबत हजारो कार्यकर्ते असल्याने आणि त्यांचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी सुरक्षेची जय्यत तयारी केली आहे.

मराठा समाजाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांची पदयात्रा नगरमार्गे पुण्यात दाखल होणार आहे. पुण्यातील खराडी परिसरात मंगळवारील पदयात्रेचा मुक्काम असणार आहे. या यात्रेला संपूर्ण मराठा समाजाकडून (Maratha Reservation) जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

एक हजार पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, गृहरक्षक दलाचे 800 जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. नगर रस्तामार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे. कोरेगाव भीमा परिसराचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयातील लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत होतो.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या निर्धारानेच मनोज जरांगे-पाटील यांनी ही लढाई छेडली आहे. मराठ्यांच्या आरक्षण लढ्याची ही अंतिम लढाई मानली जाते. त्यामुळेच आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परतणार नाही, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. त्यांच्या निर्धारामुळे मराठा समाजाच्या आशा वाढल्या असून सरकारवरील दबाव वाढला आहे.

उद्या, मंगळवारी (23 जानेवारी) मराठा समाजाचा मोर्चा खराडी-वाघोली परिसरात आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्कामी राहणार आहे. तेथे एक हजार स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, 100 पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिस आयुक्त रितेश कुमार, प्रभारी सहआयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, विशेष शाखेचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडून चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगर रस्ता भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मोर्चा शांततेत पुढे जाण्यासाठी नागरिकांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT