Maratha Reservation : नाशिक जिल्ह्यात कुणबी नोंदींबाबत उदासीनता...! प्रशासन व मराठा समाजात संघर्ष होण्याची चिन्हे ?

Kunbi Certificate Issue In Nashik : जिल्ह्यात 2.08 लाख नोंदी; पण कार्यवाही संथगतीने.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईकडे मार्च केला आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेली मुदत आज संपत आहे. नाशिकमध्ये मात्र प्रशासन कुणबी नोंदणीबाबत अतिशय संथगतीने काम करीत असल्याने या विषयावर प्रशासन आणि सकल मराठा समाजाचा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

वारंवार पाठपुरावा केल्यानंतर नाशिक जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक त्रुटी असून काही गावांमध्ये अवघ्या दोन ते चार नोंदी अपलोड झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना या नोंदी समजून घेणे कठीण झाले आहे.

Manoj Jarange
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पत्र प्रभू श्रीरामांना, शालजोडीतून भाजपला

जिल्हा प्रशासनाकडून याबाबत गावनिहाय तलाठ्यांची नियुक्ती करून नोंदणीच्या तपासणीचे काम करण्याची आवश्यकता आहे. याबाबत फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेने कुणबी दाखले वितरणाच्या कामाला दीर्घ कालावधी लागण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण मोर्चा मुंबईकडे निघाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून आता प्रत्येक गावात मराठा, कुणबी सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लवकरच तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन याबाबतची दवंडी देणार आहेत. त्यातून माहिती संकलित करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात तरी मराठा आरक्षणाच्या विषयावर सुरू असलेले काम आवश्यक गतीने होत नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकलेली नाही.

त्यामुळे येत्या काही काळात या विषयावरून मराठा आंदोलक आणि जिल्हा प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे. राज्यात 54 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात 2.08 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यातील अनेक नोंदी मोडी भाषेतील आहेत. त्याचे भाषांतर करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जात प्रमाणपत्र वितरणात अडथळे येत असल्याच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याची मुदत जवळपास संपुष्टात आली आहे. या कालावधीत प्रशासनाकडून पुरेसे काम झालेले नाही. संकेतस्थळावरदेखील अपलोड झालेल्या नोंदी अतिशय कमी आहेत. त्यामुळे एकीकडे जरांगे यांचे आरक्षणासाठी आंदोलन जोमात आहे. लाखो आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत. जिल्हास्तरावरील प्रशासन मात्र याबाबत फारसे सक्रिय नसल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Manoj Jarange
Raju Sheety : बुलढाण्यात येऊनही रविकांत तुपकरांना का टाळले? चर्चांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com