Manoj Jarange Sarkarnama
पुणे

Manoj Jarange: निरोप आला अन् जरांगे पाटील मोर्चातून माघारी फिरले!

Santosh Deshmukh Murder Case news update:मोर्चात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे, ज्योती मेटे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते.

Sudesh Mitkar

Pune News : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी बीड, परभणीनंतर पुण्यामध्ये आज मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबतच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी झाले होते. मात्र त्यांना हा मोर्चा अर्धवट सोडून जावे लागले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत.

सर्वप्रथम बीड येथे मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर काल परभणी आणि आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लाल महाल येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येथे संपणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी देखील केली आहे.

या मोर्चात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. मात्र, मराठा मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी फिरावे लागले आहे, त्याबाबतचे कारण ही समोर आले आहे.

मनोज जरांगे पाटील आज सकाळी जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली त्यानंतर जरांगे पाटील.आंदोलकांना भेटून जरांगे परतले.

मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले असल्याचे समोर आलो आहे. त्यामुळे चुलत भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी जरांगे पाटील पुण्यातून निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जनआक्रोश मोर्चातुन निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT