Manoj Jarange Patil  Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Rally in Pune : जरांगेंच्या सभेसाठी सोयाबीन काढलं; १०० एकर जमीन ५० जेसीबीने केली सपाट

Manoj Jarange Patil Khed Rally : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा आवाज आता पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये १०० एकरांवर घुमणार आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Rajgurunagar Pune News : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची नुकतीच (ता. १४) जालन्यातील अंतरवाली सराटीत रेकॉर्ड ब्रेक गर्दीची सभा झाली. त्यानंतर आता त्यांची तशीच जंगी सभा पश्चिम महाराष्ट्रात राजगुरुनगर (ता. खेड,जि. पुणे) येथे २० तारखेला म्हणजे शुक्रवारी होत आहे. सभेसाठी जोरात तयारी सुरू असून, ही तयारी अंतिम टप्यात आहे. शंभर एकरांतील या सभेला पाच लाखांची गर्दी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

अंतरवाली सराटीतील सभेत खेड तालुक्याचा मोठ्ठा आवाज घुमला होता. कारण तेथे लावण्यात आलेले सहाशे भोंगे तालुक्यातील भांबूरवाडीच्या मराठा तरुणाचे होते. हाच तरुण आणि त्याचे इतर बांधव खेडच्याही सभेत दोनशे भोंगे लावणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल क्रांती मोर्चाच्या वतीने राजगुरुनगर येथे एक ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. त्याला भेट देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे परवा येणार आहेत. सकाळी दहा वाजता खेड घाटाजवळ ते सभाही घेणार आहेत. दरम्यान, २२ तारखेची डेडलाइनजवळ आल्याने पिंपरी-चिंचवडसह इतरत्र सभा घेण्याचे रहीत करून भेटीगाठी ते घेणार असल्याचे समजते.

शंभर एकरांत सभा आणि त्यासाठी ऐंशी एकरांचे पार्किंग खेडच्या सभेसाठी करण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. सध्या ही जागा पन्नास जेसीबी आणि तेवढेच ट्रॅक्टर सपाट करीत आहेत. पोलिसांनी या जागेची पाहणी केल्यानंतर परवानगी दिली आहे. सकाळीच सभा असल्याने काही समाजबांधव हे अगोदरच्या रात्रीच मुक्कामाला राजगुरुनगर येथे येणार असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाचीही सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सभेच्या ठिकाणी फिरती शौचालये ठेवली जाणार आहेत. उन्हापासून बचावासाठी पाच लाख टोप्या व त्यापेक्षा अधिक पाण्याच्या बाटल्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याजोडीने तिथे पाण्याचे टॅंकरही असणार आहेत.

Edited by : Sachin Fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT