Maratha Reservation Latest News Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil Rally Pune : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे नवं अस्त्र उपसणार !

Maratha Reservation Latest News : सरकारने निर्णय घेतलाच नाही, तर काय आणि कसे आंदोलन करायचे?

Mangesh Mahale

Pune : मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहून, मनोज जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस -पवार सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला. तो पुढच्या दोन दिवसांत संपणार असतानाच, मराठा आरक्षणासाठी नवे अस्त्र उपसण्याचे संकेतच जरांगे-पाटलांनी पुण्यात दिले. सरकारने निर्णय घेतलाच नाही तर काय आणि कसे आंदोलन करायचे? हे २२ ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याचे सांगून जरांगे-पाटलांनी सरकारच्या पोटात गोळा आणला.

विशेष म्हणजे, पुणे जिल्ह्यात आलेल्या जरांगे-पाटलांनी शिवनेरीच्या पायथ्याला झालेल्या एका छोटेखानी सभेत सरकारला दम भरला आणि नव्या दमाने नवे आंदोलन पुकारणार असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे मराठा आरक्षणाचे पुढचे आंदोलन कुठे असेल, त्याची व्याप्ती आणि परिणाम, याकडे लक्ष राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लढण्यासाठी बळ द्या...आशीर्वादाची थाप द्या

"शिवनेरीची माती कपाळाला लावून अन्यायाविरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे," असे सांगत मनोज जरांगेंनी आज शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी जुन्नर येथे आंदोलकांशी संवाद साधला. "आरक्षणाच्या मागणीसाठी लढण्यासाठी बळ द्या. त्यांच्या पाठीवर शाबासकी अन् आशीर्वादाची थाप द्या. मराठ्याचा कोणताही मुलगा नोकरी किंवा शिक्षणावाचून वंचित राहणार नाही," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

"आम्ही शेतातली आणि मातीतली माणसं आहोत, सहजच कुणाच्याही हाताला लागणार नाही," असा इशारा त्यांनी सरकारला दिला. "आत्महत्येचं पाऊल उचलू नका," असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजातील युवकांना केले आहे. "मराठ्यांचा विषय गांभीर्याने घ्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, " असे ते म्हणाले.

नारायण राणेंना फटकारलं

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावे, या मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी तीव्र विरोध केला आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे. कुठलाही 96 कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मी स्वत: मराठा असून, आयुष्यभर कधीच कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असा पुनरुच्चार राणे यांनी काल (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला. राणेंना जरागेंनी फटकारलं. ज्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे त्यांनी घ्यावं, असे सांगत त्यांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT