Pune News : मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी "विठ्ठल" असल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खेडच्या सभेत मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले आहेत. " नोकरी शिक्षणासाठी आरक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यासाठी सुरू झालेला हा लढा यशस्वी करणार असल्याचा विश्वास वारकऱ्यांनी व्यक्त केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जालन्यातील अंतरवााली सराटीत झालेल्या सभेनंतर आज खेडमध्ये जरांगे यांनी सभा होत असून, त्यांच्या स्वागतासाठी जेसीबीतून दोन टन फुलांची पुष्पवृष्टी होणार आहे. सभेपूर्वी जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी गडावर अनवाणी पायाने पोहाेचले. तेथून ते सभास्थळाकडे रवाना झाले. "शिवनेरीची माती कपाळाला लावून अन्यायाविरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा तयार होत आहे," असे ते म्हणाले.
सहज कुणाच्याही हाताला लागणार नाही...
"आरक्षणाच्या मागणीसाठी लढण्यासाठी बळ द्या. त्यांच्या पाठीवर शाबासकी अन् आशीर्वादाची थाप द्या. मराठ्याचा कोणताही मुलगा नोकरी किंवा शिक्षणावाचून वंचित राहणार नाही," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "आम्ही शेतातली आणि मातीतली माणसं आहोत, सहजच कुणाच्याही हाताला लागणार नाही," असा इशारा त्यांनी सरकारला दिला. "आत्महत्येचं पाऊल उचलू नका," असे आवाहन जरांगेंनी मराठा समाजातील युवकांना केले आहे. "मराठ्यांचा विषय गांभीर्याने घ्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, " असे ते म्हणाले.
सरकारला अल्टिमेटम ...
अकरा वाजता खेडची सभा झाल्यानंतर तीन वाजता त्यांची बारामतीत तीन हत्ती चौकात सभा होणार आहे. काल (शुक्रवारी) सुनील कावळे या जालन्यातील युवकाने मुंबईत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याचा घटनेचा समाचार घेत जरांगे सरकारवर टीका करतील, अशी शक्यता आहे. जरांगे पाटलांनी 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.