Manoj Jarange Patil Sarkarnama
पुणे

Manoj Jarange Patil Speech : जरांगेंची शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टोलेबाजी!

Rajgurunagar News : जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस -पवार सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झोडपून काढले.

Mangesh Mahale

Pune : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आज (शुक्रवारी) शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका करीत तुफान टोलेबाजी केली. जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस -पवार सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झोडपून काढले.

मनोज जरांगे यांचे सरकारला टोले-टोमणे...

  • मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की कागदे, समित्या, आयोग सगळे सुरू होते. चार दिवसांत कायदा होऊ शकत नाही, असे सरकार म्हणते. एक महिन्याचा वेळ दिला. टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला होता, पण तसे काही झाले नाही.

  • मी हार, तुरे स्वीकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावागावांत फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. मराठ्यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या.

  • टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला. आम्ही सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला. आपण मुदत दिल्यानंतर हालचालीनंतर वेग आला आहे.

  • सरकारपुढे आता फक्त् एकच विषय आहे, मराठा आरक्षणाचा. २४ ऑक्टोबरपर्यंत शांत राहा. काहीच करू नका. सरकारचे कुठलेच प्लॅनिंग यशस्वी होऊ द्यायचे नाही. सरकारला काही करता येत नाही. सारखे दिल्लीला जातात आणि परत येतात.

  • मी कार्यक्रमच वाजवतो. टप्प्यात आल्यावर सोडतच नाही. जालन्यातील लोकांना माझा स्वभाव माहीत आहे. आपल्या मायमाऊल्या आपल्यासोबत आंदोलनात उभ्या आहेत. आता सरकारला झुकवणारच.

  • मराठा आरक्षणावरवरून माझ्या एकावरच टीका केली जाते, असे म्हणणाऱ्या छगन भुजबळांचे आम्ही नाव घेणच बंद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT