Manoj Jarange Patil Speech : उद्यापासून कामाला लागा! आंदोलन पुन्हा पेटणार...

Maratha Reservation : जरांगे-पाटलांनी पुन्हा सरकारला इशारे दिले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune : सरकारला पुढचे कळणार नाही अन् ते कधी झेपणारही नाही. हे आंदोलन कसे असेल; हे २२ तारखेला सांगणार आणि ते २४ तारखेपासून होणार आहे. त्यासाठी उद्यापासून कामाला लागण्याचे सांगून मनोज जरांगे-पाटलांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आंदोलनाच्या लढाई आत्महत्या न करता लढण्याच्या सल्लाही जरांगे पाटलांनी दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचे रोख ठेवून जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस -पवार सरकारला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झोडपून काढले. पण, त्याचवेळी शांततेचे युद्ध लढणार असल्याचेही जरांगे-पाटलांनी मोकळेपणाने सांगून टाकले. परिणामी, जरांगेंच्या सभेने मराठा आरक्षणाची लढाई आणि सरकार यांच्यातील नवे संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता कोणीच गप्प राहणार नाही. उपोषण सोडण्यासाठी मोठे प्रयत्न झाल्याचा मुद्दा उपस्थित करून जरांगे-पाटलांनी पुन्हा सरकारला इशारे दिले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Speech : सुनील कावळेचं बलिदान वाया जाऊ देणार नाही... !

"आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मागे हटणार नाही," असा एल्गार मनोज जरांगेनी पुकारला. "मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही. या ठिकाणी मी हार, तुरे स्वीकारण्यासाठी नाही तर मराठ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गावागावांत फिरत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मी मागे हटणार नाही," असे ठामपणे जरांगे पाटलांनी सांगितले.

"मराठ्यांना आरक्षण वेळेत दिले असते, तर आत्महत्या झाल्या नसत्या. मराठ्यांच्या नादी लागू नका, आमचा संयम सुटू देऊ नका," असे सांगत मनोज जरांगेंनी "सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही," असा सज्जड इशारा जरांगेंनी दिला.

मनोज जरांगे म्हणाले, "मराठा आरक्षण परिवारातील सुनील कावळे याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आमचे बळी जात आहे. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय केला. आरक्षण दिले असते इतक्या आत्महत्या झाल्या नसत्या. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहे,"

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Rally Pune : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे नवं अस्त्र उपसणार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com