Rajgurunagar News : "मराठ्यांना आरक्षण वेळेत दिले असते, तर आत्महत्या झाल्या नसत्या. मराठ्यांच्या नादी लागू नका, आमचा संयम सुटू देऊ नका," असे सांगत मनोज जरांगेंनी "सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही," असा सज्जड इशारा जरांगेंनी सरकारला दिला.
मनोज जरांगे म्हणाले, "मराठा आरक्षण परिवारातील सुनील कावळे याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भूमिकेमुळे आमचे बळी जात आहेत. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय केला. आरक्षण दिले असते इतक्या आत्महत्या झाल्या नसत्या. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहे,"
"मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत अनेक मोर्चे निघाले, पण मराठ्यांना आरक्षण समजते नाही, कारण घराघरातून आरक्षण समजून दिले नाही. आरक्षण द्यायचं म्हटलं की सरकार फक्त समित्या स्थापन करते," अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत. त्यांची सुरुवात राजगुरुनगर येथून झाली. या सभेसाठी राज्यातून लाखो आंदोलक एकवटले होते. जरांगे पाटलांनी या वेळी सरकारला सज्जड इशारा देत आरक्षण देण्याची मागणी केली.
"एक मराठा- लाख मराठा' अशा घोषणा देत ११ जेसीबीमधून जरांगे पाटलांवर पुष्पवृष्ठी करत मराठा बांधवांनी त्यांचे स्वागत केले. किल्ले शिवनेरीवर नतमस्तक झाल्यानंतर जुन्नर, नारायणगाव, कळंब, मंचर आणि राजगुरुनगर येथे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करण्यात आले.
"कोणताही 96 कुळी मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही," असा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी तिखट हल्ला चढवला आहे. अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी टीका केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.