Manoj Jarange Sarkarnama
पुणे

Manoj Jarange: मनोज जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर; मला आव्हान देऊ नका, अन्यथा...

Sachin Waghmare

Pune News: राजकीय स्वार्थापोटी मंत्री छगन भुजबळ यांनी गरीब मुलांचे आयुष्य खराब करू नये, त्यासोबतच त्यांनी आम्हाला आव्हान देऊ नये. धनगर आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र अद्याप त्यांनी धनगर आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली नाही, त्यामुळे त्यांनी कसलेच चॅलेंज आम्हाला देऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांनी बुधवारी पुण्यातील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांच्या हक्कासाठी आम्ही मुंबईच्या वेशीवर गेलो, आणि आरक्षणाचा कायदाच घेऊन परतलो. सरकारच्या अध्यादेशाचं येत्या 15 दिवसांमध्ये कायद्यात रुपांतर होईल, त्यानंतर पहिले प्रमाणपत्र मिळताच महादिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मला तरुणांच्या वेदना माहित झाल्या होत्या. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन उभे केले. येत्या १५ दिवसांत कायदयात रूपांतर होईल. शिंदे सरकारने मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला चॅलेंज करु नका. अन्यथा ओबीसींमधील गोरगरिबांचे नुकसान होईल. पण, आम्हाला कुणाचं नुकसान करुन मोठं व्हायचं नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने अधिसूचना काढली. अधिसूचनेतून 'सगेसोयरे' शब्दावर तोडगा काढल्याने मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

सरकारच्या अधिसूचने विरोधात छगन भुजबळ ठिकठिकाणी ओबीसींच्या सभा घेणार आहेत. तसेच मनोज जरांगे यांच्या भूमिकेला विरोध करणार आहेत, असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट मनोज जरांगे यांना चॅलेंज दिले होते. त्या भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगेंने पुण्यात प्रत्युत्तर दिले.

SCROLL FOR NEXT