CM Fadnavis on Maratha Kranti Morcha News : बीड प्रकरणावरून मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हालकपट्टी करावी, वाल्मिक कराडच्या व्यवहाराची 'ईडी'तर्फे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा कडून करण्यात आली आहे. एवढंच नाहीतर जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात मराठा क्रांती मोर्चा कडून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 6.50 लाख घरे राज्यभरात मंजूर करण्यात आली होती त्यामध्ये आता अतिरिक्त 13 लाख घर मंजूर करण्यात अली आहेत. त्यामुळे एका वर्षात 20 लाख घरं गरिबांना भेटणार आहेत.
देशात कोणत्याच राज्यात एवढ्या मोठयाप्रमाणात घर भेटली नाही. तब्बल 26 लाख बेघर असून त्यातील 20 लाख घर मिळणार आहेत. तर उरलेले लोकांना पुढच्या वर्षी घर मिळतील. आता सर्वांना घर येत्या 5 वर्ष्यात मिळणार आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्राच्यावतीने पंतप्रधानांचे आभार मानतो असं फडणवीस म्हणाले.
यंदाच्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ असणार नाही. यामुळे महाराष्ट्राला डावललं जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, त्याबाबत मंत्री आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्राला डावललं जातय असं काय नाही. चित्ररथाची संधी ही देशातील राज्यांना रोटेशन पद्धतीने दिली जाते, त्यानुसार यंदा दुसऱ्या राज्यांना संधी देण्यात आलेली आहे. तरी आपल्याला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी विनंती करू असं फडणवीस म्हणाले.
तसेच, राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी आज परभणी येथील मृत सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबाला भेट दिली. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने आले होते. लोकांमध्ये जातीत द्वेष निर्माण करण्याचं त्यांचं काम आहे. अशी टीका फडणवीस यांनी केली.
याशिवाय मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये निदर्शनं करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बीडच्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. दोन्ही प्रकारात आम्ही चौकशी करत असून यामध्ये जो कोणीही दोषी आढळेल त्याला सोडलं जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची निदर्शने करणे हे योग्य होणार नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.