
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी त्यांच्या नाराजीबाबत सविस्तर बोलणे झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या विजयात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठविण्याचा आमचा विचार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. (Mahayuti News)
मुख्यमंत्री सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. नाराज छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीवेळी त्यांच्याशी विविध विषयावर बोलणे झाले आहे. येत्या आठ ते दहा दिवसात मार्ग काढू, असा शब्द भुजबळ यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरे मंजूर केली होती, जी राज्यासाठी आणखी १३ लाख घरांपर्यंत वाढवली जाणार आहेत. ही खूप मोठी भेट आहे. केंद्र सरकारकडून राज्यात आतापर्यंत 26 लाख लोकांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 20 लाख लोकांना घरे दिली जाणार आहेत, ही ऐतिहासिक गोष्ट आहे.
त्यासोबतच येत्या काळात पीएम आवास योजनेतून महाराष्ट्राला 19 लाख 66 घरे मिळणार आहेत. केंद्र सरकारने पीएम आवास योजनेतील जाचक अटी हटवल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जाचक अटी हटवल्याने या योजनेचा लाभ अनेक गरजु नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी परभणीत फक्त राजकीय हेतूने आले होते. केवळ द्वेष निर्माण करणे हाच राहुल गांधींचा हेतू आहे. सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. त्यात सगळे सत्य बाहेर येईल. यात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यावर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.