Pimpri-Chinchwad Political News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीचे राज्यभरातील आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. विविध शहरांमध्ये आमदार, खासदारांना बंदी करण्यात आलेली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार होते. अंबादास दानवे येण्यापूर्वीच काही महिला आणि व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर वायसीएम रुग्णालय परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ताफा आला त्यावेळी सकल मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांची उडाली तारांबळ
अंबादास दानवे हे वायसीएम रुग्णालयात भेट देण्यात येणार असल्याने आधीच वायसीएम रुग्णालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, त्यांना विरोध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या महिला आणि तरुण पुढे आले. त्यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. त्या त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. या वेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा, अशा मोठ-मोठ्याने घोषणाबाजी केली, तर त्यांच्याकडे लक्ष न देताच दानवे हे वायसीएम रुग्णालयात निघून गेले.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.