NCP Devlali News : देवळालीत सरोज अहिरेंविरोधात इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी!

Interested candidates are present with the string presence in Devlali-शिवसेनेचे योगेश घोलप, लक्ष्मण मंडाले यांच्या पाठोपाठ तहसीलदार अहिरराव यांनाही पडू लागली विधानसभेची स्वप्ने
MLA Saroj Ahire, Yogesh Gholap & Laxman Mandale
MLA Saroj Ahire, Yogesh Gholap & Laxman MandaleSarkarnama
Published on
Updated on

MLA Saroj Ahire News : राज्यातील सध्याची राजकीय विभागणी लक्षात घेता भाजपची आघाडी आणि महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसून येतो. मात्र, देवळालीत अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विरोधात तीन प्रमुख उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. (devlali`s politics have been taken a interestrd turn before election)

लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षाकडून सुरू आहे. देवळाली (Nashik) मतदारसंघांत मात्र विधानसभेची तयारीदेखील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदार अहिरे (Saroj Ahire) यांच्याविरोधात माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) आणि गेल्या निवडणुकीत उमेदवारीची संधी हुकलेले लक्ष्मण मंडाले अतिशय जोरात तयारी करीत आहे.

MLA Saroj Ahire, Yogesh Gholap & Laxman Mandale
Jalgaon Congress: रावेर मतदारसंघासाठी नाना पटोले करणार चाचपणी!

या दोन पारंपरिक इच्छुकांत आता राजकीय आरोप झालेल्या तसेच राजकीय तसेच जिल्ह्याधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी आता थेट नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे आघाड्या दोन व इच्छुक चार अशी स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच देवळाली मतदारसंघातील राजकारणात रंगत आली आहे.

पुढील वर्षी एप्रिल व मेमध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी आहे. देवळाली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत घोलप कुटुंबीयांच्या गडाला सरोज अहिरे यांनी खिंडार पाडले. तेव्हाच येथे निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पाच टर्म या मतदारसंघातून माजी मंत्री बबन घोलप निवडून आले. त्यानंतर न्यायालयाच्या एका निकालामुळे घोलप यांना निवडणूक लढविता आली नाही.

आता माजी आमदार योगेश घोलप (शिवसेना), तनुजा घोलप आणि प्रीतम आढाव (भाजप), लक्ष्मण मंडाले (शरद पावर गट) यामध्ये आता राजश्री आहिरराव यांची भर पडली आहे. आघाड्या दोन व उमेदवार उदंड अशी स्थिती झाली आहे. यात कोणाला मतदार संधी देतील, हे पाहणे रंजक असेल.

MLA Saroj Ahire, Yogesh Gholap & Laxman Mandale
Drug Mafia Lalit Patil case : शिवसेनेचे माजी महापौर पांडे यांची पोलिसांकडून चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com