Manoj Jarange Patil, Chhagan Bhujbal Sarkarnama
पुणे

Jarange Patil Vs Chhagan Bhujbal : जरांगे पाटील पुण्यातून भरणार हुंकार; भुजबळ निशाण्यावर ?

Jarange Patil Vs Chhagan Bhujbal : आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण घेत असून, कोणाच्या ताटातलं हिसकावून घेत नाही..

Chetan Zadpe

Pune News : मराठा आरक्षणासाठी लढा पुकारून सरकारला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील लवकरच आता पुण्यात सभा घेत आहेत. रूग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर ते पुण्यातील खराडी या भागात २० नोव्हेंबर रोजी एक जाहीर सभा घेत आहेत. या सभेत मराठा समाजाला ओबीसीतल्या समावेशावर विरोध करणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ निशाण्यावर असण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी २४ नोव्हेंबर ही मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे. अंतरवाली सराटी येथील उपोषण नऊ दिवसांनंतर स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल झाले होते. रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २० नोव्हेंबरला जरांगे पाटील यांची पुण्यात खराडी भागात सभा पार पडणार आहे, मराठा समाज बांधवांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा ओबीसीत प्रवर्गात समावेशाबद्दल विरोध केला आहे. मराठा समाजाच्या या भूमिकेवर भुजबळ यांनी मोर्चा काढून जशास तसे उत्तर देण्याचे सुतोवाच केले. भुजबळांच्या वक्तव्यामुळे दोन समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण घेत नसून, कोणाच्या ताटातलं हिसकावून घेत नाही, कुणीही नाहक वाद करू नयेत, असे आवाहनही जरांगे यांनी केले. यानंतरही भुजबळ यांचे वक्तव्य होत असल्याने, त्यामुळे पुण्यातील सभेत जरांगे मुख्यत्वे भुजबळांना निशाण्यावर घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुण्यातल्या या सभेसाठी पुणे शहरातील व आसपासच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज एकत्रित जमणार आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, त्यांच्या आरक्षणावर आक्रमण होत नाही, कारण कुणबी हे ओबीसीच असून आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. विनाकारण दोन समूहांमध्ये भांडणं लावू नयेत, असे आवाहन जरांगेंनी केले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT