Wai NCP News : नितीन पाटलांनी केले मकरंद आबांचे कौतुक; म्हणून ते तीन टर्म आमदार झाले...

Nitin Patil मापारवाडी- वाकणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत जलजीवन योजनेचा शुभारंभ नितीन पाटील यांच्या हस्ते झाला.
MLA Makrand Patil, Nitin Patil
MLA Makrand Patil, Nitin Patilsarkarnama
Published on
Updated on

-विलास साळुंखे

Wai Political News : वाई-खंडाळा -महाबळेश्वर तालुक्याचे आमदार तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी विधानसभा मतदारसंघातील गावागावात विकासाची गंगा पोचविण्याचे काम केले आहे. मतदारसंघामधील कोणताच भाग विकासापासून वंचित राहणार नाही, याची तंतोतंत काळजी घेऊन आबांच्या विकास कामांचा झंझावात यापुढेही असाच कायम राहणार आहे, अशी ग्वाही सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.

वाई तालुक्यातील Wai Politics मापारवाडी- वाकणवाडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जलजीवन योजनेचा शुभारंभ नितीन पाटील Nitin Patil यांच्या हस्ते झाला. यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक रामदास इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नितीन पाटील म्हणाले, मकरंदआबांनी विकास कामांबाबत कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळेच आबांनी केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे गेली तीन टर्म त्यांना मोठ्या फरकाने विजयी करून विधानसभेवर पाठविलेले आहे. Maharashtra Political News

MLA Makrand Patil, Nitin Patil
Satara Political News : अभिजित बिचुकलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 500 रुपयांत घरगुती सिलिंडर द्या...

भ्रष्टाचारामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या किसन वीर कारखानाही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव ताब्यात घेऊन त्याची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नजीकच्या काळात किसन वीर कारखानाही सुस्थितीत येणार असून यासाठी ऊस उत्पादक सभासदांनीही यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांनी कोणाच्याही तत्कालीन अमिषाला बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा.

Edited By : Umesh Bambare

MLA Makrand Patil, Nitin Patil
Pune BJP: भाजपची महिला कार्यकारिणी जाहीर; महिला पदाधिकाऱ्यांवर सोपवल्या नव्या जबाबदाऱ्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com