Pune News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून, मराठा आरक्षणचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले. मराठा समाजातील तरुण आक्रमक होऊन रस्त्यावरती उतरत आहेत. उपोषणाच्या सातव्या दिवशी आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. पुणे - बंगळुरू महामार्गावर मराठा आरक्षण आंदोलकांककडून रास्ता रोको केलं जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ आंदोलकांनी टायर जाळले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. (Latest Marathi News)
मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा आंदोलक जमले आहेत, यामुळे ते आक्रमक होत आहेत. या ठिकाणी टायर जाळण्यात आलेले आहेत. आंदाेलकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे आंदोलकांची भूमिका आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, मागील दोन तासांपासून हे आंदोलन सुरू असताना, या ठिकाणी रुग्णवाहिका आणि शाळेचे बस-वाहनं यांना वाट करून त्यांचा रस्ता मोकळा केला जात आहे. मात्र, पुढे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याने या महामार्गावरील वाहने आणि प्रवासी अडकून पडले आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या आंदोलनाने आणखी उग्र स्वरूप धारण केल्यास येथे समस्या निर्माण होऊन, कायदा सुव्यस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत शांततेचं आवाहन केले आहे. सुळे म्हणाल्या, "मी सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे. माझा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे की, इतकं सगळं महाराष्ट्रात घडतंय तुम्ही आहात कुठे? गृहमंत्र्याचे हे अपयश आहे. एवढं सगळं होईपर्यंत त्यांना याची माहिती नव्हती का? एकीकडे ड्रग्जचं प्रकरण झालं, बीडला हिंसाचार झाला आज नवले ब्रीजजवळ हे सर्व घडतंय. गृहमंत्र्यांच लक्षच नाही, दुसऱ्या राज्यात पक्षाच्या प्रचारात ते इतके गुंतले आहेत की, सर्वसामान्यांकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळच नाही, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.