Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे पाटील हे देशभरात पोहाेचलेत. लहान मुलालादेखील आता मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आवड निर्माण झाली आहे. मात्र, कोल्हापुरातील शिंदे गटाच्या खासदारांनाच जरांगे पाटील यांचे नावच माहिती नसल्याचे समोर आले आहे. माध्यमांसमोर बोलताना त्यांनी चक्क 'अशोक जरांगे पाटील' असा उल्लेख केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणसंदर्भात राज्यभरातील सत्ताधारी व विरोधक आमदारावर टीका होत असताना कोल्हापुरात मात्र सकल मराठा समाजाच्या आंदोलनात शिंदे गटाच्या खासदारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील दसरा चौक येथे सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनस्थळी भेट देण्यास आलेल्या शिंदे गटाच्या खासदारांवर ही वेळ ओढवली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, खासदार संजय मंडलिक यांनी आज संध्याकाळी होणाऱ्या आमदार-खासदारांच्या बैठकीत सामुदायिक राजीनामा देण्यास सर्वांना विनंती करणार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. जोपर्यंत मराठा आरक्षणसंदर्भाचा विषय मिटत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
सकल मराठा समाजाकडून गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी काँग्रेसच्या आमदारांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर आज शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. खासदार संजय मंडलिक येताच मराठा समाजाच्या बांधवांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
"या मुख्यमंत्र्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय." " आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाचं बापाचं, " अशा घोषणा देत खासदारांच्या समोरच मराठा समाजाने परिसर दणाणून सोडला. खासदारांच्या समोरच हा प्रकार झाल्याने आंदोलन स्थळावरून खासदार संजय मंडलिक यांनी काढता पाय घेतला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक यांनी सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर जाऊन साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.
कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा आरक्षणासंदर्भात गावोगावी नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, गगनबावडा, कागल, चंदगड, भुदरगड, शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा तालुक्यात जवळपास दीडशेपेक्षा अधिक गावांत आमदार, खासदारांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे आंदोलन स्थळावर आल्यानंतर त्या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या संधीचा फायदा घेत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.